Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २२९ दिवसांवर

मुंबईतील कोरोनावाढीचा दर ०.३० टक्क्यांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २२९ दिवसांवर
SHARES

मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटू लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या घटण्याबरोबरच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २२९ दिवसांवर पोहोचला आहे. तसंच मुंबईतील कोरोनावाढीचा दर ०.३० टक्क्यांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के झाला आहे.


सोमवारी मुंबईत कोरोनाचे अवघे ५९९ नवीन रुग्ण आढळले. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५०७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. मुंबईतील एकूण रुग्ण संख्या २ लाख ६५ हजार १४२ झाली आहे. आतापर्यंत १० हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईतील  २ लाख ३७ हजार २९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये १६ ९२३ रुग्ण उपचार घेत आहेत.


दरम्यान  कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा