Advertisement

पीपीईचा अभाव, अग्निशमन दलाच्या नियमांत बदल

आता अग्निशमन दलानं त्यांच्या काम करण्याच्या प्रणालीत बदल केला आहे.

पीपीईचा अभाव, अग्निशमन दलाच्या नियमांत बदल
SHARES

मुंबईतील अग्निशमन दलाला नुकताच एक गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फोन आला होता. त्याच्यासोबत एक मृतदेह देखील होता. घरातल्या इतरांना पण COVID 19न झाल्याचा संशय अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना होता. पण अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल पूर्णपणे तयार नव्हते. स्वत:चं रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे PPE किट्स उपलब्ध नाहीत. शिवाय योग्य ती संरक्षण यंत्रणा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे आता अग्निशमन दलानं त्यांच्या काम करण्याच्या प्रणालीत बदल केला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना कोणत्याही संरक्षक गियरशिवाय खोलीत प्रवेश करण्याचा धोका पत्करावा लागला. यामुळे त्यांनाही Coronavirus चा होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच, अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे यासंगर्भात तक्रार केली. जेणेकरून त्यांना पुरेश्यी PPE किट्सचा पुरवठा केला जाईल आणि ते त्यांचं  काम करू शकतील. मुख्य अग्निशमन अधिकारी पी.एस. रहांगडाले यांनी माध्यमांशी बोलून त्यांना आश्वासन दिलं की लवकरच अग्निशमन दलाला योग्य संरक्षणात्मक गियर उपलब्ध करुन देण्यात येतील. जेणेकरून त्यांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका नसेल.

कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी लगणारं PPE किट्स आणि संरक्षक उपकरणं ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. जगभरात PPE किट्सची कमतरता आणि त्याचा अयोग्य वापर केला जात आहे. भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं अलीकडेच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात पीपीई म्हणजे काय? त्याचा वापर कसा आणि का केला जातो? याची माहिती दिली आहे.



हेही वाचा

कोरोना रुग्णांसाठी पालिकेकडून २०० रुग्णवाहिकांची व्यवस्था

Coronavirus Pandemic: राज्यभरात 1 हजारहून जास्त पोलिस कोरोना बाधित

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा