Advertisement

Coronavirus Updates: पाणी घातलेले ३ लाखांचे सॅनिटायझर जप्त

बोगस उत्पादकांनी पाणी घालून सॅनिटायझरची तसंच बनावट मास्कचीही विक्री सुरू केली आहे.

Coronavirus Updates: पाणी घातलेले ३ लाखांचे सॅनिटायझर जप्त
SHARES

कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण होऊ नये म्हणून अनेकजण मास्क (Mask), सॅनिटायझर (sanitizer) आणि हॅण्डवॉशचा (handwash) वापर करत आहे. त्यामुळे या वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच गैरफायदा काही बोगस उत्पादकांनी घेतला आहे. या बोगस उत्पादकांनी पाणी घालून सॅनिटायझरची तसंच बनावट मास्कचीही विक्री सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) असे ३ लाख रुपयांचे बनावट सॅनिटायझर मुंबईतून जप्त (seized) केले आहे. 

 अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) वाकोला येथे छापा टाकून बनावट सॅनिटायझर  (sanitizer) जप्त केले. संस्कार आयुर्वेद या कंपनीकडून या बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच  अन्न व औषध प्रशासनाने कंपनीवर छापा टाकला. याशिवाय  कांदिवलीतून २ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या उत्पादकाकडे भिवंडी येथे सॅनिटायझर बनवण्याचा परवाना होता. तो परवाना रद्द झाला होता. मात्र, मागील ८ दिवसात ही कंपनी पुन्हा सुरू होऊन त्यांनी बनावट सॅनिटायझर बनवण्यास सुरूवात केली. या बनावट सॅनिटायझरची विक्री खुलेआम होत होती. १५० ते २०० रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या या सॅनिटायझरमध्ये पाणी तसंच गुळगुळीत द्रावण वापरल्याचं आढळून आलं. या कंपनीकडे असलेले नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक, एफडीएचा परवाना बनावट असल्याचं समोर आलं आहे. 


बनावट मास्कची विक्रीही जोरात सुरू आहे. एन ९५ या मास्कसाठी एफडीएने निर्देश जारी केले आहेत. हे मास्क 'औषध' या गटात मोडत नसले तरीही जनहितार्थ हे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, मास्कवर बंदी घालण्यात आली आहे, असे समजू नये ज्यांना गरज आहे त्यांनीच ते वापरावेत, असे एफडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 


हेही वाचा -

Coronavirus Update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणार

Corona Virus : मुंबईत जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा