Advertisement

पालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांचा बेमुदत संप

मुंबई महानगर पालिकेच्या २०२ आरोग्य केंद्रातील चार हजार आरोग्य सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. तर जोपर्यंत आपल्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या आरोग्य सेविकांनी केला आहे.

पालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांचा बेमुदत संप
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या २०२ आरोग्य केंद्रातील चार हजार आरोग्य सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. तर जोपर्यंत आपल्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या आरोग्य सेविकांनी केला आहे. त्यामुळे संप जर लवकर मिटला नाही तर त्याचा विपरीत परिणाम पालिकेच्या आरोग्य सेवेवर आणि रूग्णांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी या संपाची दखल घेतली आहे. त्यानुसार आरोग्यसेविकांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी आरोग्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं आहे. त्यामुळे या चर्चेत तोडगा निघतो का की संप सुरूच राहतो हे मंळवारीच समजेल.


या आहेत प्रमुख मागण्या

महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आरोग्यसेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. तर पालिका प्रशासनानं पूर्णवेळ कामगार म्हणून सेवेत सामावून घ्यावं ही प्रमुख मागणी आरोग्यसेविकांची आहे. तसंच आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना २०२१ पासून किमान १२००० रूपये वेतन द्यावं, पालिका कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या सेवाशर्ती आरोग्य सेविकांना लागू कराव्यात, सर्व आरोग्य सेविकांना भविष्य निर्वाह निधी आणि भरपगारी प्रसूती रजा देण्यात याव, अशाही आरोग्यसेविकांच्या अन्य मागण्या आहेत. या मागण्या अनेक वर्षांनी प्रलंबित असून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आरोग्यसेविका सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. पण सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं आरोग्यसेविका आक्रमक झाल्या असून त्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.


आश्वासनाला बळी पडणार नाही

त्याचाच भाग म्हणून ऑगस्ट २०१८ मध्येही आरोग्य सेविकांनी संप पुकारला होता. या संपाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं होतं. या आश्वासनाला कित्येक महिने उलटले तरी आश्वासन काही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे सरकारला आपल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आरोग्यसेविका पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. सोमवारपासून, २८ जानेवारीपासून पालिकेच्या सर्व पालिका रूग्णालयातील चार हजारांहून अधिक आरोग्यसेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. संपादरम्यान आरोग्यसेविका आझाद मैदानावर धरण आंदोलन करत आहेत. याआधी आम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवत संप मागे घेतला. पण आता मात्र अशा कोणत्याही आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी माहिती अॅड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, पालिका यांनी दिली आहे.



हेही वाचा -

पूर्व द्रुतगती मार्गावर फुलली 'बसंत रानी'

शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसरातील २०० पानटपऱ्यांना पोलिसांचा दणका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा