Advertisement

शासकीय औषध खरेदी हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशनमधून


शासकीय औषध खरेदी हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशनमधून
SHARES

शासकीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी हाफकिनमध्ये स्वतंत्र कक्षदेखील कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

राज्यात आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज संस्थांची रुग्णालये, तसंच आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत होती.


वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागांतर्गत वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये यांच्यासाठी औषधे, उपकरणे आणि साधनसामुग्री यांची खरेदी करण्यात येत होती. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्यासाठी औषधे, उपकरणे आणि साधनसामुग्री यांची खरेदी स्थानिक स्वराज्य संस्थाकडून करण्यात येत होती.

अशा वेगवेगळ्या विभागांकडून खरेदी होत असल्याने, अनेकदा एकाच प्रकारच्या औषधे, उपकरणे आणि साधन सामुग्रीच्या दरांमध्ये आणि मानांकनामध्ये फरक आढळून येत होता. हा फरक दूर करून खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दिली होती. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि शासनाच्या अन्य विभागांच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. यांच्याकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. अंतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.



हेही वाचा -

तुमचा डॉक्टर बोगस असू शकतो

कट प्रॅक्टिस कायद्यात डॉक्टरांसाठी कडक नियमावली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा