Advertisement

२० नव्या बाइक अॅम्ब्युलन्स ताफ्यात सामील

मुंबईत ही सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे २६०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आता मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

२० नव्या बाइक अॅम्ब्युलन्स ताफ्यात सामील
SHARES

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या बाईक अॅम्ब्युलन्स सेवेच्या ताफ्यात मंगळवारी आणखी २० नवीन बाईक अॅम्ब्युलन्स सामील करण्यात आल्या. या वाहनांचा लोकार्पण सोहळा परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला.


कधी झाली होती सुरूवात?

आरोग्य विभागाच्या ‘शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवे’अंतर्गत २ ऑगस्ट २०१७ राेजी बाइक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली होती. सुरूवातीला मुंबईत १० बाइक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या. त्यात २० बाइक अॅम्ब्युलन्सची भर पडली आहे. या बाइक ॲम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर, नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत.



१०८ डायल करून मिळेल सेवा

१०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर बाइक ॲम्ब्युलन्सची सेवा रुग्णाला तत्काळ उपलब्ध होईल. या अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णावर त्वरीत प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील.


प्रशिक्षित डाॅक्टर

ही बाइक ॲम्ब्युलन्स प्रशिक्षित डॉक्टर चालवणार आहेत. शिवाय या अॅम्ब्युलन्समध्ये औषधे, श्वसनमार्गावरील उपचारासाठी लागणारी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होणार आहेत.



गोल्डन अवर महत्त्वाचा

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला काही मिनिटांमध्ये प्राथमिक उपचार मिळणं आवश्यक असतं. खासकरून रुग्णासाठी पहिला तासभर खूप महत्वाचा असतो. या तासाला 'गोल्डन अवर' म्हणतां. या तासात रुग्णावर तातडीने उपचार झाल्यास त्याचा जीव वाचू शकतो.


२६०० रुग्णांवर उपचार

मुंबईत ही सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे २६०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आता मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.



हेही वाचा-

मुंबर्इत धावणार बार्इक अॅम्ब्युलन्स विथ स्ट्रेचर

इडियट नव्हे, चतुर... हार्टअटॅक येऊनही बाईकवरून गाठलं हॉस्पिटल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा