Advertisement

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश

इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश
SHARES

कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली.

यासंदर्भात ट्विटरवरून अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ज्या तऱ्हेने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनदरम्यानच्या मधल्या काळात आपण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देता आॅनलाईन, आॅफलाईन, यू ट्युब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. 

हेही वाचा- कोरोनामुळे १० वी, १२ वी परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

शाळा बंदच

खरं तर या वर्षभरात आपण पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करू शकलो नाही, पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या. परंतु त्यातही काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, तर काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या, त्या ठिकाणीसुद्धा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. तरीही आपण मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 

सरसकट पास

परंतु सध्याची कोरोनाची (coronavirus) स्थिती पाहता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन करणं शक्य नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट पास करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

(maharashtra government decided to promote students of class 1st to class 8th in to the next class without any examinations says varsha gaikwad)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा