Advertisement

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक! एकाच दिवशी ५.५२ लाख नागरिकांना लस

राज्यात आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक! एकाच दिवशी ५.५२ लाख नागरिकांना लस
SHARES

राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणाच्या या पहिल्याच दिवशी राज्यात दिवसभरात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. 

आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचं अभिनंदन केलं आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असं आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. 

यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असंही डॉ.व्यास यांनी सांगितलं.

हेही वाचा- राज्यात ९ हजार ४३ कोरोना रूग्ण बरे

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण ५७,४२,२५८  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ३४० झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची १४,४५३, पुण्यात  १६ हजार ९५५ तर ठाणे जिल्ह्यात १३ हजार ५७० आहे. कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ०२३ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ७७२ इतकी झाली आहे. 

(maharashtra registered highest 5 lakh 52 thousand covid 19 vaccination in one day on Tuesday)

हेही वाचा- राजावाडी रुग्णालयातील रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला, महापौर म्हणाल्या....



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा