Advertisement

पालिका रुग्णालयातील अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठवा, महापौरांचे निर्देश

महापौरांनी मंगळवारी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

पालिका रुग्णालयातील अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठवा, महापौरांचे निर्देश
SHARES

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील कायमस्वरूपी पदावरील अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्याचे निर्देश महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी दिले आहेत.  पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील सर्व अधिष्ठातांची आढावा बैठक महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी मंगळवारी सायंकाळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेग्विन कक्षाच्या सभागृहात घेतली. यावेळी महापौरांनी मंगळवारी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. 

 पालिका रुग्णालयातील  कोरोनाबाबतची अत्यावश्यक सेवा लक्षात घेता कायमस्वरूपी पदावरील डॉक्टर, परिचारिका तसंच चतुर्थश्रेणी पदावरील कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्यास अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस काढण्याची सूचना महापौर किशोरी किशोरी पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठातांना दिल्या आहेत.

 प्रमुख रुग्णालयातील मृतदेहांची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक असून संबंधित पोलिस स्टेशनबाबत काही अडचण असल्यास रुग्णालयनिहाय यादी सादर करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.  त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांची विभागनिहाय कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली याची सविस्तर माहिती महापौरांनी जाणून घेतली. रुग्णांची  कुठल्याही प्रकार  हेळसांड होऊ नये, असे निर्देश महापौरांनी  सर्व संबंधितांना यावेळी दिले. यापुढील काळात महापालिकेने रुग्णवाहिकांची स्वतः खरेदी करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.

 त्याचप्रमाणे औषध साहित्यांचा पुरेसा साठा आहे का? त्याची सविस्तर माहिती महापौरांनी सर्व संबंधित  अधिष्ठाताकडून जाणून घेतली. व्हेंटिलेटरची कमतरता असल्यास त्याची ताबडतोब मागणी नोंदविण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.

 त्यानंतर आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी मृत पावलेल्या व्यक्तींचे मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत मृत व्यक्तीचे आजारासंबंधित कागदपत्रे तपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातर्फे मृत्यु प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. 

 गरोदर मातांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉ.  केसकर यांनी दिली. मुंबईच्या विविध स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी  बंद असल्याचा मुद्दा महापौरांनी यावेळी उपस्थित केला. बहुतांश विद्युतदाहिनी सुरू करण्यात आले असल्याची माहिती डॉ. केसकर यांनी यावेळी दिली. याबाबत मुक्ती पॅटर्नच्या मशीन्स  चांगल्या असून या मशीन स्मशानभूमीत बसविण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.

 या बैठीकीला उपायुक्त (आरोग्यसेवा) रमेश पवार, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल,    केएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जोशी,  कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.पिनाकिन गूजर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा