Advertisement

मुंबईतील १ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व नर्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईतील १ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची आरोग्य कर्मचारी दिवसरात्र सेवा करत आहेत. मात्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मागील तीन महिन्यात मुंबईतील १ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांवर अहोरात्र उपचार करणारे डॉक्टर व नर्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या रुग्णालयातील काही डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. मरोळमधील सेव्हन हिल्स या कोव्हिड रुग्णालयातील एक डॉक्टराचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. तर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातील ३ डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत.  

परळमधील केइएम रुग्णालयात मार्च महिन्यात ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यातील १०९ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तर ७७ जण क्वारंटाइन आहेत. यात २१ डॉक्टर व १८ नर्स यांचा समावेश आहे. सायन रुग्णालयातील उप अधिष्ठाता यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तीन महिन्यांत सायन रुग्णालयातील ३०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना  ससंर्ग झाला आहे. यात १०० डॉक्टर व ७० नर्सचा समावेश आहे. तर इतर कर्मचारी आहेत.

नायर रुग्णालयातील ५० डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. पीपीई किट सहज उपलब्ध होऊ लागल्यानं आता संसर्गाचा धोका टळला असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितलं. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात १०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ६ डॉक्टर आहेत. तर, कोकिळाबेन रुग्णालयातील २०० कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.हेही वाचा -

'ही' आहे मुंबईतील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन यादी

गैरहजर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई पालिकेकडून ७२ तासांची नोटीस
संबंधित विषय
Advertisement