Advertisement

३ कोटीहून अधिक नागरिकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले.

३ कोटीहून अधिक नागरिकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस
SHARES

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.

लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच १ कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा- सार्वजनिक ठिकाणची गर्दी तातडीने थांबवा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

दरम्यान, आज रात्री आठपर्यंत सुमारे ६ लाख १३ हजार ८६५ एवढे लसीकरण झाले. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक झाली, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच सार्वजनिक ठिकाणी गर्दी देखील वाढत आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी ठेवायची असेल, तर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

(more than 3 crore people got first dose of covid 19 vaccine in maharashtra)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा