Advertisement

कस्तुरबा रुग्णालयात ‘Delta Plus’ चाचणी होणार

आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही.

कस्तुरबा रुग्णालयात ‘Delta Plus’ चाचणी होणार
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या (Coronavirusडेल्टा प्लस ( Delta Plus) या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC) आता कस्तुरबा रूग्णालयात (Kasturba Hospital) जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवणार आहे.

यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही. याच्या चाचण्या मुंबईतल्या कस्तुरबामध्ये केली जाईल.

मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या दोन आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन आणले जाणार आहे. या ठिकाणी केवळ दोन ते चार दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळणार आहे.

मुंबई महापालिकेला ‘डेल्टा प्लस’ संशयितांचे सुमारे ६०० रिपोर्ट मिळाले आहेत. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. मात्र मुंबई महापालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे.

सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागतो.

मात्र ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.हेही वाचा

कोरोनातून बरे झाल्यानंतर असा असावा आहार

‘स्पुटनिक व्ही’ पुण्यात दाखल, 'या' तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा