Advertisement

मुंबई पोलिसांच्या मजेशीर ट्विट्सनं नेटिझन्सना लावलं याड


मुंबई पोलिसांच्या मजेशीर ट्विट्सनं नेटिझन्सना लावलं याड
SHARES

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ट्विटरवर काही मजेशीर पद्धतीनं प्रसिद्ध रॉक बँडचे फोटो शेअर केले आहेत. कोरोनाव्हायरसच्या (coronavirus update) वाढत्या प्रादुर्भावाुमळे या फोटोद्वारे पोलिसांनी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. रॉक बँडची नावे चतुराईनं वापरुन मुंबई पोलिसांनी नागरिकांना U2 असा मेसेजही दिला आहे. stay at home, Backstreet boys; do not loiter, Oasis; your home, Linkin Park; do not visit अशी या ब्रँडची नावं आहेत. या पोस्टला नेटिझन्सनी चांगलीच पसंती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या चतुराईनं नेटकरी भलतेच इंमप्रेस झालेले दिसत आहेत. 

यापूर्वी मुंबई पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चित्रपटातील संवादांचा वापर केला होता. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, “मी त्याला एक मास्क ऑफर करणार आहे ज्याला तो नाकारू शकत नाही.” मास्क घालण्याची गरज का आहे हे सांगण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना व्हायरस होण्यापासून वाचण्याकरता मास्क कसा आवश्यक आहे यावर भर देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी बॉलिवूड कलाकारांचा समावेश केला होता. यापूर्वी रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये आलिया भट्टनं असं लिहिलं होतं की “तो लॉकडाऊन दरम्यान बाहेर फिरायला जात आहे असं जेव्हा तो म्हणतो”

 सोशल मीडियाचा वापर करून लॉकडाउन उल्लंघन करणार्‍यांना घरी रहाण्याची आठवण करून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या इशाऱ्याच्या “सर्जनशील पैलू”चं कौतुक केल्यानं या मिम्सनं इंटरनेटवर मजेशीर वातावरण निर्माण केलं आहे. 

दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं गुरुवारी सकाळी सांगितलं की, देशात COVID 19 रुग्णांची संख्या ५२ हजार ९५२ वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ७८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत १५ हजार २६७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. १६ हजार ७६९ रुग्ण हे महारा,ट्रातील आहेत. तर गुजरात दुसर्‍या क्रमांकावर आहे. दिल्लीमध्ये ५ हजार हून अधिक रुग्ण असून दिल्लीचा तिसरा क्रमांक लागतो.

तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मंगळवार, ५ मे २०२० रोजी मुंबई शहरातील लॉकडाऊनमधून दिलेली सवलत मागे घेण्याचा निर्णय घेतला. ज्यात दारूची दुकानं पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण दारूच्या दुकानांबाहेर होणारी गर्दी पाहता हा निर्णय मागे घेण्यात आला. बुधवारपासून केवळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्याचं जाहीर करण्यात आलं.



हेही वाचा

२६/११ हल्ल्यातील साक्षीदार मुंबईच्या रस्त्यावर जगतोय आयुष्य

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा