Advertisement

मुंबईत नव्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार

दिवसभरात मुंबईत २० हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत नव्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार
(Representational Image)
SHARES

दिवसभरात मुंबईत २० हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. यात कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल १७,१५४ रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही.

अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलंय. दरम्यान, आज रुग्णालयात एकूण १ हजार १७० रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिवसभरात एकूण २ हजार ८३७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा ८८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर तब्बल ६७, ४८७ इतक्या चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.

तर काही दिवसांपूर्वी महापौर म्हणाल्या होत्या की, २० हजारचा आकडा पार झाला, तर केंद्रानं दिलेल्या निर्देशांनुसार कडक पावलं उचलावी लागतील. आता केंद्रानं लॉकडाऊनबाबतचे सगळेच निर्णय घेण्याबाबतचे अधिकार हे राज्यांना दिलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

तर महाराष्ट्रात आज कोरोनाचे ३६ हजार २६५ नवे रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात एकूण १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली.



हेही वाचा

मुंबई लोकलबद्दल राजेश टोपे काय म्हणाले? जाणून घ्या

परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा