Advertisement

कोरोनिलची ट्रायल घेतली नाहीच, निम्सच्या डॉक्टरांचा खुलासा

जयपूरच्या निम्स रुग्णालयानं औषधाचे क्लिनिक ट्रायल केल्याचं दावा फोल ठरवला आहे.

कोरोनिलची ट्रायल घेतली नाहीच, निम्सच्या डॉक्टरांचा खुलासा
SHARES

योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदनं कोरोना प्रतिबंधक कोरोनिल हे औषध चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. या औषधावर आधी केंद्र आणि मग राज्य सरकारनं प्रश्न उपस्थित केले. आता तर जयपूरच्या निम्स रुग्णालयानं औषधाचे क्लिनिक ट्रायल केल्याचं दावा फोल ठरवला आहे.

विशेष म्हणजे पतंजलीनं जयपूरच्या निम्स रुग्णालयात या औषधावर क्लिनिकल ट्रायल केल्याचा दावा केला होता. पण आता निम्सनंच माघार घेलती आहे. त्यामुळे पतंजलीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निम्सचे चेअरमन बीएस तोमर यांनी सांगितलं की, पतंजलीच्या कोरोनिलचं ट्रायल आपल्या रुग्णालयात झालंच नाही. आम्ही कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिलं होतं. याला बाबा रामदेव यांनी कोरोनाचा १०० टक्के उपचार करणारे औषध कसे म्हटले, याबाबत मी आता काहीच सांगू शकत नाही. याबाबत फक्त रामदेव बाबाच सांगू शकतात.

निम्सनं सीटीआरआईकडून (Clinical Trials Registry India - CTRI) २० मे रोजी औषधाच्या इम्युनिटी टेस्टिंगसाठी परवानगी घेतली होती. यानंतर निम्समध्ये या औषधांचं ट्रायलही सुरू झालं. कोरोना झालेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच ट्रायलचा परिणाम समोर आला आहे.

कोरोनिल लाँच होण्याची काही तासानंतर आयुष मंत्रालयानं पतंजलीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचबरोबर पतंजलीला या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितलं. तोपर्यंत औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. खोकला-तापच्या औषधासाठी परवाना दिला होता, कोरोना औषधासाठी परवाना कसा मिळाला, याची चौकशी केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारनं देखील रामदेव बाबांना यावरून चांगलंच धारेवर धरलं. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, केंद्र सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाकडून कंपनीनं परवानगी घेतलेली नव्हती. या औषधाची क्लिनिकल ट्रायलही घेण्यात आली नाही. या औषधाला इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल सायन्सचीसुद्धा परवानगी नसताना देखील ज्याप्रकारे पतंजलीनं या औषधाची जाहिरातबाजी केली, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जर पतंजलीनं कोरोनिल औषध घेतल्यानं कोरोना बरा होतो असा दावा करत जर या औषधाची जाहिरात वा विक्री केली, तर नियमानुसार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.



हेही वाचा

कोरोनावर औषध असल्याचा दावा भोवला, रामदेव बाबांना महाराष्ट्र सरकारचा दणका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा