Advertisement

दिलासादायक! धारावीत मागील आठवड्यात एकही मृत्यू नाही

मुंबईतील धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. मात्र, आता येथील रुग्णसंख्या घटत आहे.

दिलासादायक! धारावीत मागील आठवड्यात एकही मृत्यू नाही
SHARES

मुंबईतील धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. मात्र, आता येथील रुग्णसंख्या घटत आहे. विशेष म्हणजे ३० मे ते ७ जून या कालावधीत धारावीत कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही. धारावीत आतापर्यंत १९१२ कोरोना रुग्ण सापडले आहेत.  तर, आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीमध्ये मोठया प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. ६ जून रोजी १० आणि ७ जून रोजी धारावीत कोरोनाचे फक्त १३ रुग्ण आढळले आहेत. धारावीत आतापर्यंत ४६.८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. धारावीतील मृत्यूचे प्रमाण ३.७६ टक्के  आहे. ३० मे पासून धारावीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. २९ एप्रिलला धारावीमध्ये सर्वाधिक ९१ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.

 मुंबई महापालिकेच्या पथकांनी घरोघरी जाऊन ७ लाखांहून अधिक रहिवाशांची केलेली तपासणी, रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका दवाखाने आणि खासगी दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचं विलगीकरण यामुळं धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला यश येत आहे. 



हेही वाचा -

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा