Advertisement

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता नाही - राजेश टोपे

कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता पुढील महिन्याच्या किमान मध्यापर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता नाही - राजेश टोपे
(Representational Image)
SHARES

कोविड-19 प्रकरणांची वाढ लक्षात घेता, पुढील महिन्याच्या किमान मध्यापर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

टोपे यांच्यानुसार प्रतिबंध लागू करून तसंच लसीकरणाचा वेग वाढवून संसर्गाचा प्रसार कसा कमी केला जाऊ शकतो. टोपे पुढे म्हणाले की विषाणूचा प्रसार रोखणे हे प्राधान्य आहे, तथापि, छोट्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे.

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात लसीकरणाची संथ गती आणि नुकतेच लागू करण्यात आलेले निर्बंध यावर चर्चा झाली. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, मंत्रिमंडळ सदस्यांचा असा विश्वास आहे की शैक्षणिक संस्था बंद राहिल्या पाहिजेत. दररोज आकड्यांचे निरीक्षण केले जात आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.

खात्यांच्या आधारे, त्यांनी महाराष्ट्रात लसीकरणाच्या संथ गतीबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकित नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी लसीकरण करावं, यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. लोक रेशन सारखी सवलत घेतात पण लसीकरण करत नाहीत हे चुक्चं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

टोपे म्हणाले की, ते लसीकरण सक्तीचे करू शकत नसले तरी, जनतेच्या हितासाठी प्रत्येकाने लसीकरण केले जाईल याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यांना कठोर उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

याआधी, महाराष्ट्रातील सुमारे ९८ लाख लोक अद्याप पहिला डोस घेऊ शकले नाहीत असा मेसेज व्हायरल झाला आहे. यासंदर्भात अद्याप कुठलीच अधिकृत माहिती मिळाली नाही.



हेही वाचा

पालिका होम टेस्ट किट खरेदी करणाऱ्यांची माहिती गोळा करतेय

महापालिकेत स्थगिती असूनही बायोमेट्रिक हजेरी सुरूच

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा