Advertisement

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे २०० रुग्ण

मुंबईत मागील ५ महिन्यात स्वाईन फ्लूचे २०० रुग्ण आढळले असून स्वाईन फ्लूमुळं दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे  २०० रुग्ण
SHARES

मुंबईत मागील ५ महिन्यांत स्वाईन फ्लूचे २०० रुग्ण आढळले आहेत. तसंच, स्वाईन फ्लूमुळं दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत २०१६मध्ये स्वाईन फ्लूची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर, २०१९ मध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची संख्या वाढली आहे. त्याशिवाय, मार्च महिन्यात स्वाईन फ्लूमुळं २ जणांचा मृत्यू झाला होता.


रुग्णांच्या संख्येत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या फेब्रूवारी महिन्यामध्ये ३९ होती. मार्चमध्ये ही संख्या ८५ झाली. त्यानंतर मे मध्ये ही संख्या कमी होऊन २९ इतकी झाली. वातावरण बदलल्यामुळं स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं समजतं आहे.


१९ जणांचा मृत्यू

पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यात मुंबईमध्ये 'एचवनएनवन'चा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरतो. २०१५ मध्ये संपूर्ण देशात स्वाईन फ्लूचा विषाणू पसरला होता. त्यावेळी मुंबईत १ हजार ८१५ रुग्ण आढळले असून, १९ जणांचा मृत्यू झाला होता. स्वाईन फ्लुची सर्वाधिक लागण ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांना होते. त्याचप्रमाणं, अशक्तपणा, ताप येणे, डोके दुखणे, खोकला ही स्वाईन फ्लुची लक्षणे आहेत. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ति कमी असते, त्यांना देखील स्वाईन फ्लूची लागण पटकन होते.हेही वाचा -

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून २ जण जखमी

अंधेरीत चुलत भावाची गोळ्या झाडून हत्याRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा