Advertisement

Covid Updates: ठाण्यातील Delta plus चा एकमेव रुग्ण झाला बरा

कोरोनाच्या डेल्टा प्लस (delta plus) व्हेरिएंटचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसच्या एका रुग्णाचा मृत्यू (death) झाला आहे.

Covid Updates:  ठाण्यातील Delta plus चा एकमेव रुग्ण झाला बरा
SHARES

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस (delta plus) व्हेरिएंटचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसच्या एका रुग्णाचा मृत्यू (death) झाला आहे.  

रत्नागिरीतील (ratnagiri) तीन मुलं (children) डेल्टा प्लस व्हेरिएंटमधून बरे झाले आहेत. तर आता ठाणे (thane) जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या एकही डेल्टा प्लसचा अ‌ॅक्टिव्ह रुग्ण नाही.

ठाण्यात काही दिवसांपूर्वी डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळला होता. तो मूळचा रायगडमधील होता. या रुग्णावर नवी मुंबई या ठिकाणी उपचार करण्यात आले होते. सध्या तो बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता इतर कोणालाही डेल्टा प्लसचा संसर्ग झालेला नसल्याचं आढळून आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये तीन बालकांचा यामध्ये समावेश होता. ३ वर्षे, ४ वर्षे आणि ६ वर्षांच्या बालकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली होती. मात्र, आता त्यांनी त्यावर मात केली आहे. 

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे आणखी १४ नवे रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या आता ३४ पर्यंत गेली आहे. तसंच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत.  देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळले आहेत. 



हेही वाचा -

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा