Advertisement

मुंबईकरांनो, 'सोसल' तेवढंच वापरा सोशल मीडिया, नाहीतर वेडं व्हाल!


मुंबईकरांनो, 'सोसल' तेवढंच वापरा सोशल मीडिया, नाहीतर वेडं व्हाल!
SHARES

सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचं युग आहे. इंटरनेवर बसल्या ठिकाणी सर्व माहिती मिळते. रोजच्या धावपळीत आपण आपल्या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी दिवसभर बोलू शकतो. हा सोशल मीडिया आणि इंटरनेट आज सर्वांच्याच जवळचा झाला आहे. पण याच इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं मुंबईत मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.


कुणाचा अहवाल?

मानसिक आजारावर उपचार घेण्याची गरज असणाऱ्या शहरांत मुंबई चक्क पहिल्या स्थानावर आहे. तर राज्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.


कुणी केला?

मुंबईत जे.जे. रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी हे सर्वेक्षण केलं होतं. ज्यात मुंबईसह राज्यातील नागरिकांना मानसोपचाराची सर्वात जास्त गरज असल्याचं निदर्शनास आलं आहे.


'या' शहरांत सर्वाधिक मनोरुग्ण

  • मुंबई - (३८ हजार ५८८)
  • कोलकाता - (२७ हजार ३९४)
  • बंगळुरू - (२४ हजार ३४८)


सव्वा लाख रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांत मानसिक आजारावर उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. तर राज्यातील जवळपास सव्वा लाख लोक मानसिक आजारावर उपचार घेत असल्याचंही उघड झालं आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे.



हेही वाचा-

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष - कामाच्या तणावात जातंय निम्म आयुष्य! 

मानसिक आजारानं त्रस्त आहात? 'वन रुपी क्लिनिक'मध्ये या...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा