Advertisement

मोफत आरोग्य शिबीर


मोफत आरोग्य शिबीर
SHARES

सोनापूर - ‘सावली’ या सामाजिक संस्थेने भांडुप पश्चिमेकडील सोनापूर परिसरात आरोग्य आणि हृदय चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये टू.डी ईको, बायपास ऑपरेशन, ई. सी .जी., ब्लड प्रेशर, कॅन्सर ऑपरेशन, अँन्जीओग्राफी या महागड्या चिकित्सा अगदी मोफत करण्यात आल्या. दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या हृदयाची कळजी कशी घ्यायला हवी, या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन केले होते. भांडुपकरांनी या चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद दिला म्हणून सावली संस्थेचे संस्थापक आणि शिबिराचे उद्घाटक गणेश श्रीधर जाधव यांनी आभार मानले. यावेळी अनवर मुल्ला, नरसिंग तिवारी, ईरशाद खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा