Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

म्हणणं आधी समजून घ्या, पुनावाला यांनी पत्रक काढत मांडली बाजू

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून सध्या देशातील लस उत्पादनाची स्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत पुनावाला यांनी एका पत्रकाद्वारे पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.

म्हणणं आधी समजून घ्या, पुनावाला यांनी पत्रक काढत मांडली बाजू
SHARES

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी धमकावलं जात असल्याच्या दाव्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला सध्या चर्चेत आहेत. तसंच सरकारकडून आॅर्डर नसल्याने लस उत्पादन मंदावल्याचं वृत्तही येत आहे. या सर्व वृत्ताचं त्यांच्याकडून खंडन करण्यात आलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून सध्या देशातील लस उत्पादनाची स्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत पुनावाला यांनी एका पत्रकाद्वारे पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याने मी हे स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही. हे आपल्याला समजण्याची गरज आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणं सोपं काम नाही. लसींची मात्रा वाढवण्यासाठी अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत आहेत.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला सरकारकडून शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सर्व प्रकारचं सहकार्य मिळत आहे. 

हेही वाचा- ‘त्या’ वृत्तनिवेदकाची दिलगिरी, पुनावाला धमकी प्रकरणात ‘शिवसेनेचे गुंड’ असा उल्लेख

आतापर्यंत आम्हाला २६ कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या ११ कोटी डोससाठी आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. 

प्रत्येकाला लस मिळावी असं वाटत असल्याचं आम्ही जाणून आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. अत्यंत मेहनतीने आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू, असं त्यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लस पुरवण्यासाठी आपल्याला देशातील वेगवेगळे मुख्यमंत्री, बडे नेते आणि उद्योजकांकडून धमकावण्यात येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी इंग्लडमधील यू.के 'दि टाईम्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर देशात चर्चांना उधाण आलं. 

(serum institute ceo adar poonawalla statement on covid 19 vaccine production in india)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा