Advertisement

‘त्या’ वृत्तनिवेदकाची दिलगिरी, पुनावाला धमकी प्रकरणात ‘शिवसेनेचे गुंड’ असा उल्लेख

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना शिवसेनेचं गुंड धमकावत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे इंडिया टुडे वृत्त वाहिनीचे वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी अखेर या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘त्या’ वृत्तनिवेदकाची दिलगिरी, पुनावाला धमकी प्रकरणात ‘शिवसेनेचे गुंड’ असा उल्लेख
SHARES

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना शिवसेनेचं गुंड धमकावत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करणारे इंडिया टुडे वृत्त वाहिनीचे वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी अखेर या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली आहे.

या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकवल्याचं वक्तव्य राहुल कंवल यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई वृत्तवाहिनीला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसंच, राहुल कंवल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर राहुल कंवल यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेची जाहीर माफी मागितली आहे.

समाजात गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या कारस्थानामध्ये मग्न असलेल्या काही घटकांकडून शिवसेनेची बदनामी करण्याचे डाव खेळले जात आहेत. 

हेही वाचा- ‘त्या’ पक्षाने खबरदार राहावं, अदर पुनावाला प्रकरणावरून शेलारांचा इशारा

इंडिया टुडेच्या राहुल कंवल यांनी दिलेली बातमी अशीच निराधार आणि शिवसेनेची बदनामी करणारी. सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिल्याची पूर्णपणे खोटी बातमी चॅनलवर काल पसरवली होती. त्याबद्दल शिवसेनेतर्फे मी कडक शब्दांत निंदा केली आहे.

इंडिया टुडेच्या प्रमुखांना त्याबाबत पत्र दिलं. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अतिशय खंबीरपणे सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जात आहे. यापुढेही अशा कारस्थानांना भिक न घालता आमचं समाजकारण आणि जनहिताचं कार्य निर्धारपूर्वक सुरू राहील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सीरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हिडिओ शिवसेनेचा नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. त्यामुळं झालेल्या गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत राहुल कंवल यांनी माफी मागितली आहे.

(india today anchor rahul kanwal apologizes shiv sena)
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा