Advertisement

वाफ घेतल्याने कोरोनाचा धोका कमी, सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा

स्टीम (वाफ) थेरपीमुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो, असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासात करण्यात आला आहे.

वाफ घेतल्याने कोरोनाचा धोका कमी, सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा
SHARES
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्टीम (वाफ) थेरपीमुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो, असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासात करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्गावर झालेल्या रुग्णांना गरम पाण्याची वाफ गुणकारी ठरेल, असं पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील संशोधनात म्हटलं आहे.


हा अहवाल इंडियन मेडिकल गॅजेटमध्येदेखील प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे याची विश्वासार्हताही अधिक असल्याचं बोललं जात आहे. शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु नये किंवा तो कमी व्हावा यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. त्यासाठी अनेक घरगुती उपायही केले जात आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे स्टीम थेरपी आहे. यावर मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी अभ्यास केला आहे.

कोरोनाची लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणं असलेले आणि अजिबात लक्षणं नसलेल्या अशा सर्वांना प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून स्टीम घेणे गुणकारी ठरु शकते. हे संशोधन पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या अभ्यास अहवालानुसार, या स्टीम थेरपीचा कोरोनाची लक्षणे आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपयोग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल इंडियन मेडिकल गॅजेटमध्येदेखील प्रसिध्द झाला आहे.



हेही वाचा -

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा