Advertisement

नवी मुंबईत दाखल झाली रशियातील स्पुटनिक व्ही लस

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सानपाडा येथे राहणाऱ्या फायना फिलिप या तरुणीला ही लस देऊन या लसीकरणाला सुरुवात झाली.

नवी मुंबईत दाखल झाली रशियातील स्पुटनिक व्ही लस
SHARES

रशियन  बनावटीची आणि एकच डोस पुरेसा असेली स्पुटनिक व्ही लस  कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता नवी मुंबईत उपलब्ध झाली आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे गुरूवारी ७५ नागरिकांना स्पुटनिक व्ही लस देण्यात आली. 

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सानपाडा येथे राहणाऱ्या फायना फिलिप या तरुणीला ही लस देऊन या लसीकरणाला सुरुवात झाली. स्पुटनिक लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणं गरजेचं आहे. तसेच ९६१९४५४५४५  या नंबरवर फोन करून नाव नोंदवता येणार आहे.  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे हे लसीकरण सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. 

दरम्यान, नवी मुंबई पालिका प्रशासनाने  डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार आहे.  पालिकेला पहिल्या टप्प्यात दहा हजार स्पुटनिक लस कुप्या मिळणार आहेत.

भारतात रशियाची स्पुटनिक व्ही कोरोना लसीचं उत्पन्न डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून या लशीची किंमत ११४५ रुपये आहे  रशियातील शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. 

चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा झाले नाहीत. असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट'मधील अहवालात केला आहे. 

दोन अब्ज डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी  रशियाने या लसीची नोंदणी केली होती. म्हणजेच कोरोना विरोधातील जगभरातली ही पहिली लस आहे.



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा