Advertisement

Ward D वरील हॉटस्पॉटचा टॅग हटला, कंन्टेंमेंट झोनची संख्याही घटली

मुंबईतील हॉटस्पॉट (Mumbai Hotspot) म्हणून ओळखला जाणाऱ्या D वॉर्डमध्ये आता सर्वात कमी रुग्ण आहेत.

Ward D वरील हॉटस्पॉटचा टॅग हटला, कंन्टेंमेंट झोनची संख्याही घटली
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील वरळी, धारावी सारखे भाग कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट ठरत आहेत. आतापर्यंत झोपडपट्टी, चाळ, कोळी वाडे हे कोरोनाव्हायकसचे हॉटस्पॉट म्हणून समोर येत होते. या यादीत उच्चभ्रू निवासी परिसरांच्या नावाचा देखील समावेश होता. पण आता परिस्थिती बदलत आहे.

पालिकेचा D वॉर्डमध्ये (D Ward) सुरुवातीला सर्वात जास्त कोरोनाव्हायरस (Coronavirus Update) बाधित रुग्ण होते. मुंबईतील हॉटस्पॉट (Mumbai Hotspot) म्हणून ओळखला जाणाऱ्या D वॉर्डमध्ये आता सर्वात कमी रुग्ण आहेत. D वॉर्डमध्ये मलबार हिल, नेपन्सी रोड, पेडर रोड आणि ब्रीड कॅन्डी हे उच्चभ्रू परिसर येतात.

मागच्या काही दिवसात इथली परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. निवासी परिसर, घरात काम करणारा नोकर वर्ग, घरात सामान पोडोचवणारी मुलं, किराणा दुकानाचा मालक यामध्ये नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. पालिकेच्या २१ मे पर्यंतच्या माहितीनुसार सध्या D वॉर्डमध्ये ८१२ रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी ४१० बरे होऊन घरी परतले आहेत.

पालिकेच्या (BMC) माहितीनुसार, गेल्या आठवड्यात १४ नोकर आणि घरकाम करमाऱ्या महिलांची चाचणी पॉझिटिव्ह आली. याशिवाय ४५ डिलिव्हरी सेवा पुरवणारी मुलं आणि किराणा दुकानदार यांच्या चाण्या देखील पॉझिटिव्ह होत्या.

"सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. अनेक जण परदेशातून आले होते. सर्वात जास्त रुग्ण संख्या असणारा D वॉर्ड सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावर होता. पण जशी रुग्णांची संख्या कमी झाली तसा D वॉर्ड १० क्रमांकावर गेला आहे," अशी माहिती सहाय्यक महानगरपालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी मुंबई मिररला दिली.

गायकवाड म्हणाले की,  वॉर्डमधील कंटेन्टेंमेंट झोनची संख्या देखील १२० नं कमी झाली आहे. सध्या ३० आहेत.

"आमचं कंन्टेंमेंट झोनचं नियोजन योग्य ठरलं. त्यामुळे आम्हाला कन्टेंमेंट झोनची संख्या कमी करणं शक्य झालं. आता सध्या त्या झोन्समध्ये एकही रुग्ण नाही. पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढीचा दर सध्या ४.१ आहे. रुग्णांच्या वाढिचा आकडा आता १७ दिवसांवर गेला आहे. सध्या वॉर्डमध्ये नवीन एकही रुग्ण नाही."

पालिकेच्या माहितूनुसार, १४ घर काम करणारे, ४५ डिलिव्हरी पोहोचवणारे, ४३ पोलिस अधिकारी, पालिका अधिकारी आणि बेस्ट कर्मचारी यांची चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय १७५ आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यासंदर्भात गायकवाड बोलले की, "अधिक चाचण्या केल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत आहे. ताप मोजण्यासाठी उभारण्यात आलेली कॅम्प आणि कॉन्टेक्ट ट्रेसिंग यामुले आकडा वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून कंन्टेंमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. काहींना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं. शिवाय १४ पॉझिटिव्ह आढळलेल्या घरकाम करणाऱ्यांचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरमालकांचे देखील चाचण्या घेण्यात आल्या.”

केंद्र सरकारच्या पथकानं D वॉर्ड मध्ये नुकताच दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी पालिकेच्या वॉर्ड D मधील खेतवाडीसारख्या इतर परिसरांमध्ये देखील घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं. दोन आठवड्यानंतर खूप कमी रुग्ण या परिसरात आढळले.

“अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे बरेचट कर्मचारी आमच्या वॉर्डमध्ये राहतात. त्यापैकी काही बेस्ट कर्मचारी, पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज जिमखाना, द विलिंगटन जिमखाना आणि एसआरएच्या इमारतींमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले. आता सध्या आमच्याकडे १ हजार ११० क्वारंटाईन सुविधा आहे. रुग्णांचा बरा होण्याचा रेट ५२ टक्के आहे.”      



हेही वाचा

फक्त २४ कर्मचारी आणि ४००० कॉल्स, पालिका नियंत्रण कक्षाची 'तारेवरची कसरत'

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा