Advertisement

धक्कादायक! ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित

बाळकुम येथे ठाणे महापालिकेने अकराशे खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय उभे केले आहे. हे रुग्णालय ठाण्यात संजीवनी ठरले. मात्र, आता याच रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करणारे काही डॉक्टर्स बोगस असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक! ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित
SHARES

ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळकुम येथील ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडले आहेत. प्रशिक्षण नसलेले डॉक्टर या रुग्णालयात आढळल्याने इथे उपचार घेऊन गेलेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या जीविताशी प्रशासनाने दगा केल्याची भावना व्यक्त होत आहे. या बोगस डॉक्टरावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्टवादी काँग्रेसने केली आहे.

 बाळकुम येथे ठाणे महापालिकेने अकराशे खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय उभे केले आहे.  हे रुग्णालय ठाण्यात संजीवनी ठरले. मात्र, आता याच रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करणारे काही डॉक्टर्स बोगस असल्याचं समोर आलं आहे. यात २ इंटरशिप पूर्ण न केलेले तर १ डॉक्टर हा विदयार्थी असल्याचं आढळून आलं आहे. या तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकाऱ्यांनी पकडले असून त्यांच्याबद्दलचा अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे.

या रुग्णालयात डॉक्टर नेमण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते आणि त्याच्याकडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आल्यांचं बोललं जात आहे. 
या प्रकरणी आम्ही चौकशी करतोय, लवकरच नेमका प्रकार काय आहे ते उघड होईल, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे. तर हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करावी झाली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशी अंतर्गत जर हे  डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केली आहे.हेही वाचा -

मस्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement