Advertisement

उडान फाऊंडेशन तर्फे सरकारी दरात घरी होणार कोरोना चाचणी, जाणून घ्या कशी?

‘उडान फाऊंडेशन’ नागरिकांना कोरोना चाचणी घरच्या घरी उपलब्ध करून देणार आहे.

उडान फाऊंडेशन तर्फे सरकारी दरात घरी होणार कोरोना चाचणी, जाणून घ्या कशी?
SHARES

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. मुंबईत (Mumbai Corona tests) दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘उडान फाऊंडेशन’ नागरिकांना कोरोना चाचणी घरच्या घरी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे नागरिकांना लॅबमध्ये जावून ताटकळत वाट बसावी लागणार नाही. त्याचबरोबर नागरिकांचा वेळही वाचेल.

“कोविड ट्रॅकरच्या ९९२३९९१०७५ या हेल्पलाईन वर संपर्क साधल्यास नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे समुपदेशन मिळेल. तसंच आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या घरी जाऊन पुढील चाचण्या आणि औषधोपचार दिले जातील.

गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदत केली जाईल. या सर्व सुविधा शासकीय दरात आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पुरविण्यात येतील”, अशी माहिती कोविड ट्रॅकरच्या वतीनं देण्यात आली.

मुंबईतील नागरिकांसाठी ‘उडान फाऊंडेशन’च्या वतीनं ‘कोविड ट्रॅकर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा कामिनी राहुल शेवाळे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाविषयी मार्गदर्शन आणि विविध चाचण्या या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरच्या घरी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

“उडान फाऊंडेशनच्या वतीने सूरु करण्यात आलेल्या ‘कोविड ट्रॅकर’ हेल्पलाईन सुविधेला माझ्या शुभेच्छा! या हेल्पलाईनमुळे रुग्णालयात न जाता घरच्या घरी कोविड चाचणी करणं नागरिकांना शक्य होईल. तसंच काही प्रमाणात सरकारी वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊ शकेल. दक्षिण-मध्य मुंबईतील गरजू रुग्णांना या योजनेत सामावून घेण्यासाठी ‘राधा फाऊंडेशन’च्या वतीनं सहकार्य करण्यात येईल”, अशी प्रचतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.


हेही वाचा

हिंदुजा रुग्णालयात १०१ वर्षांच्या आजोबांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

मुंबईतल्या 'या' भागात कोविड रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा