Advertisement

‘शील’मध्येही म्हाडाच्या फायली असुरक्षित! १८ हजार फायली जळून खाक

'शील' कंपनीतील ४ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये आग लागली होती. या आगीत म्हाडाच्या १८ हजार फायली जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी म्हाडाने तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘शील’मध्येही म्हाडाच्या फायली असुरक्षित! १८ हजार फायली जळून खाक
SHARES

फायली गायब होणं, फायलींना आग लागणं, उंदरांनी फायली कुरडतणं अशा गोष्टी सरकारी कार्यालयातील फायलींसाठी काही नव्या नाहीत. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा (एसआरए)मध्ये गेल्या काही वर्षांत असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे फायली सुरक्षित ठेवण्यासाठी म्हाडानं कोट्यवधींचा खर्च करत सर्व फायली महापे येथील 'शील' (स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड) या कंपनीत ठेवल्या. पण इथंही म्हाडाच्या फायली सुरक्षित नसून कंपनीत लागलेल्या आगीत तब्बल १८ हजार फायली जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांत तक्रार

'शील' कंपनीतील ४ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये आग लागली होती. या आगीत म्हाडाच्या १८ हजार फायली जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी म्हाडाने तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


चिंतेची गरज नाही?

म्हाडाच्या १८ हजार फायली जळाल्या असल्या तरी चिंता करायची गरज नाही. या सर्व फायलींचं डिजिटायझेशन करण्यात आलं होतं, त्यामुळे म्हाडाचं कोणतंही नुकसान झालं नसून या फायली नव्यानं तयार करून घेण्यात येतील, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी म्हाडाच्या फायली 'शील'मध्येही सुरक्षित नसल्याचं म्हटलं जात आहे.


४ लाख फाइल्स

विविध सरकारी कार्यालयातील फायली सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी आणि अत्याधुनिक यंत्रणा 'शील' कंपनीत आहे. फायलींचं डिजिटायझेशन करत मूळ फाईल 'शील'मधील कपाटात ठेवल्या जातात. इथं सर्व फाइल सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. तर एखादी मूळ फाईल हवी असल्यास एका मिनिटांतच फाईल निश्चित स्थळी पोहोचवली जाते. अशा या 'शील'मध्ये म्हाडाच्या तब्बल ४ लाख फायलींचं जतन करण्यात आलं आहे.


कधी लागली आग?

११ डिसेंबर २०१७ ला 'शील'मधील ४ क्रमांकाच्या कंपार्टमेंटला आग लागली. तिथं म्हाडाच्या फायली होत्या. त्यातील सुमारे १८ हजार फायलींचं नुकसान झालं आहे. या प्रकारानंतर मुंबई मंडळानं या प्रकरणाची चौकशी करत ३ महिन्यांनंतर हलगर्जीपणा केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तर अद्यापपर्यंत 'शील'ने स्कॅनिंग केलेल्या फायलींच्या प्रति दिल्या नसल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल कऱण्याची मागणीही केली आहे.



हेही वाचा-

पत्राचाळ प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात, बिल्डरला मजबूत दणका

यंदाही म्हाडा लाॅटरीचा मुहूर्त चुकणार?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा