Advertisement

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचा ३५ वा टप्पा पूर्ण

मेट्रो ३ मधील एकूण ७ पैकी ४ पॅकेजेसमध्ये भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झालं आहे. पॅकेज ४ मध्ये भुयारीकरण करणं मोठं आव्हानात्मक होतं.

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचा ३५ वा टप्पा पूर्ण
SHARES

मुंबई मेट्रो ३ मधील सिद्धिविनायक ते दादर हा १.१२ किलोमीटरचा ३५ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या भुयारीकरणासह पॅकेज ४ चे एकूण १०.९६ किमी लांबीचं भुयारीकरण बुधवारी पूर्ण झालं. या भुयारीकरणासाठी ३ टीबीएम मशीन्स कार्यरत होती.

मेट्रो ३ मधील एकूण ७ पैकी ४ पॅकेजेसमध्ये भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झालं आहे. पॅकेज ४ मध्ये भुयारीकरण करणं मोठं आव्हानात्मक होतं. या पॅकेजमधील सर्व विकासकामे रस्त्यावरील वाहतूक, धार्मिक स्थळांच्या जवळपास आहेत. 

हेरेन्कटनेट कंपनीद्वारे बनलेले व अर्थ प्रेशर बॅलेन्स (ई.पी.बी) तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) कृष्णा १ द्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. ७ जुलैला या टप्प्याचं काम सुरू करण्यात आलं होतं ८०५ रिंग्सचा वापर करून डाऊनलाइनचे काम पूर्ण करण्यात आलं आहे. दादर मेट्रो स्थानकाचं  ४२ टक्के काम पूर्ण झाल्यातं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प)एस. के. गुप्ता यांनी सांगितलं.

पॅकेज ४ मध्ये दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी या स्थानकांचा समावेश असून येथे ८ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा