Advertisement

'जेव्हीएलआर'ची रुंदी वाढली, करा 'ट्राफीक फ्री' प्रवास


'जेव्हीएलआर'ची रुंदी वाढली, करा 'ट्राफीक फ्री' प्रवास
SHARES

जुहू-वर्सोवा लिंक रोड आणि स्वामी विवेकानंद मार्ग यांना जोडणाऱ्या जे. व्ही. एल. आर. विस्तारीत मार्गावरील १९ अनधिकृत दुकाने आणि व्यावसायिक गाळ्यावर कारवाई करून महापालिकेने हा मार्ग मोकळा केला आहे. परिणामी वाहनचालकांना या मार्गावरून विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

अंधेरी पश्चिमेकडील जेव्हीएलआर विस्तारीत मार्गावरील इन्फिनिटी मॉलजवळ महापालिकेच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम झाल्याचं आढळून आलं होतं.


१९ अनधिकृत बांधकामे हटवली

या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार कारवाई सुरू करण्यात आली. पण दुकानदारांनी न्यायालयात याचिका केल्याने न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवल्यानंतर महापालिकेच्या के/पश्चिम विभागाने धडक कारवाई करत १९ अनधिकृत व्यावसायिक बांधकामे हटवली.


के-पश्चिम विभागाची कारवाई

१२० फूट रुंद असलेला रस्ता काही ठिकाणी अतिक्रमणामुळे ९० फुटापर्यंत कमी झाला होता. त्यामुळे परिमंडळ - ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग २ दिवस कारवाई करून १९ व्यवसायिक अनधिकृत बांधकामे तोडल्याची माहिती के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. यामुळे या रस्त्याची रुंदी वाढून परिसरातील वाहतूक सुरळीत होणार असल्याचंही त्यांनी संगितलं.


पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई

या व्यतिरिक्त जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटरमधील वाहनतळ जागा, तळ मजलाही तोडण्यात आला आहे. यानुसार एकूण २० अनधिकृत बांधकामे तोडण्यात आल्याची माहिती के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचं विशेष सहकार्य महापालिकेला लाभलं. २० पोलिसांचा ताफा या कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित होता.



हेही वाचा - 

अनधिकृत बांधकामांविरोधात आबासाहेब जऱ्हाडांची धडक कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा