Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती, ऑगस्टमध्ये पालिकेचे 'हे' ३ कोविड जम्बो सेंटर्स पुन्हा सुरू

दुरुस्ती आणि अपग्रेडेशनसाठी मे महिन्यात बंद झालेल्या या केंद्रांच्या देखभालीसाठी पालिका २ ते ५ कोटी रुपये खर्च करत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती, ऑगस्टमध्ये पालिकेचे 'हे' ३ कोविड जम्बो सेंटर्स पुन्हा सुरू
(File Image)
SHARES

कोरोनाच्या रुग्णांमध्ये सध्या घट पाहायला मिळत आहे. पण ऑगस्टनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुलुंड आणि दहिसर इथल्या ३ जम्बो कोविड -१९ केंद्रांना ऑगस्टच्या मध्यापासून टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यास सांगितलं आहे. दुरुस्ती आणि अपग्रेडेशनसाठी मे महिन्यात बंद झालेल्या या केंद्रांच्या देखभालीसाठी पालिका २ ते ५ कोटी रुपये खर्च करत आहे.

येत्या आठवड्यात या केंद्रांमधील किमान २० ते २५ टक्के बेड कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी पुष्टी केली की, ३ जम्बो सेंटर लवकरच कार्यान्वित होतील. “प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास हे सेंटर्स कार्यरत ठेवण्याचा विचार आहे,”

सुरुवातीला ही सेंटर्स क्षमतेनुसार चालणार नाहीत. कारण सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. एका प्रशासकिय अधिकाऱ्यानं सांगितलं की, ३ ऑगस्टपासून देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे १०-१२ दिवसांनी प्रकरणांमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या, भायखळ्यातील रिचर्डसन आणि क्रुडास, गोरेगावमधील नेस्को आणि वरळीतील एनएससीआय ही तीन जंबो केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या रुग्णांना प्रवेश दिला जातो. मरोळमधील सेव्हनहिल्स हॉस्पिटल मध्यम आणि गंभीर प्रकरणांची देखभाल करत आहे.

तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी, मालाडमध्ये चार नवीन क्षेत्रीय रुग्णालयं येत आहेत. सायनमधील सोमय्या मैदान, महालक्ष्मी आणि कांजूरमार्गमधील रेसकोर्स असे एकूण, पालिकेनं जवळपास २० हजार जम्बो सेंटर बेड तयार करण्याची योजना आखली आहे.

काकानी म्हणाले की, भविष्यात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास जम्बो कोविड सेंटर्स खूप मोठी भूमिका बजावतील. कारण सायन, केईएम, बीवायएल नायर आणि कूपरसह वैद्यकीय महाविद्यालये गैर-कोविड आजारांवर लक्ष केंद्रित करतील.

दहिसर केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या तीन महिन्यांत ऑक्सिजन लाईन अपग्रेड केल्या गेल्या. प्रकरणं वाढू शकतात म्हणून आम्हाला तयारीत राहण्यास सांगितलं गेलं आहे. आम्ही ५० बेडपासून सुरुवात करू शकतो आणि हळूहळू सर्व उघडू शकतो. सात जर्मन हँगर्स, वॉर्ड्स असलेल्या इमारतींची देखभाल करण्यासाठी महामंडळ ४ कोटी रुपयांची आधारभूत किंमत खर्च करते. या सुविधेत जवळपास ७६० बेड आहेत.



हेही वाचा

समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक– राजेश टोपे

मुंबईतील नायर रुग्णालयात जिनोम लॅब, एकाच वेळी ४०० चाचण्या आणि २ दिवसात रिपोर्ट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा