Advertisement

मेट्रो ३ ची रात्रपाळी पुन्हा सुरू; उच्च न्यायालयाची परवानगी

ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो ३ ची रात्रपाळी अर्थात रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती शुक्रवारी उच्च न्यायालयाने उठवली आहे.

मेट्रो ३ ची रात्रपाळी पुन्हा सुरू; उच्च न्यायालयाची परवानगी
SHARES
Advertisement

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ चं रात्री होणारं काम गेल्या कित्येक महिन्यापासून बंद आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो ३ ची रात्रपाळी अर्थात रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती शुक्रवारी उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता पुन्हा रात्रीच्या वेळेस मेट्रो ३ चं काम सुरू होणार असून हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) साठी मोठा दिलासा मानला जात आहे.


रहिवाशी उच्च न्यायालयात

‌मेट्रो ३ चं काम एमएमआरसीला निर्धारित वेळेत पूर्ण करायचं आहे. त्यामुळे २४ तास मेट्रो ३ चं काम केलं जातं आहे. पण या रात्रीच्या वेळेच्या कामाचा त्रास कुलाबा, चर्चगेट परिसरातील रहिवाशांना होत होता. मशीनच्या आवाजामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाला त्रास होत आहे, रात्रीची झोप उडाली आहे असं म्हणत अॅड. रॉबिन जयसिंघनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


काम बंदचा फटका

‌रॉबिन यांनी आपल्या याचिकेद्वारे नुकसान भरपाई म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे १० हजार रुपये महिना मागितले आहेत. याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने मेट्रो ३ चं रात्रीच काम बंद केलं होतं. पण हे काम बंद झाल्याचा मोठा फटका मेट्रो प्रकल्पाला बसत होता. तर प्रकल्प वेळेत पूर्ण होणार की नाही याची डोकेदुखी एमएमआरसीला झाली होती. ‌त्यामुळे ही बंदी उठवावी अशी मागणी एमएमआरसीकडून केली जात होती. अखेर शुक्रवारी न्यायालयाने ही मागणी लक्षात घेत मेट्रो ३ च्या रात्रपाळीवरील बंदी उठवली आहे. त्यानुसार आता मेट्रो ३ चं काम वेग घेणार हे नक्की.


ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत

यासंदर्भात मुंबई लाइव्हने याचिकाकर्ते रॉबिन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, रात्री काम करण्यास एमएमआरसीला परवानगी दिली आहे. पण हे काम ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळत करावं.  मात्र, आपण अद्याप न्यायालयाचा पूर्ण आदेश वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक बोलू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.हेही वाचा -

बापरे! म्हाडा कोकण मंडळाच्या १७३६ घरांसाठी अर्जच नाही

अभिनंदन ! ७५४ अर्जदारांना लाॅटरीआधीच लाॅटरी
संबंधित विषय
Advertisement