Advertisement

आरेत राडा, 'एमएमआरसी'च्या बेकायदा कामाविरोधात तक्रार दाखल


आरेत राडा, 'एमएमआरसी'च्या बेकायदा कामाविरोधात तक्रार दाखल
SHARES

आरे मिल्क काॅलनी परिसरात कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. असं असताना 'एमएमआरसी'ने प्रतिबंधित परिसरात बॅरिगेटस लावून भरणीचं काम सुरू केल्याने खवळलेल्या 'सेव्ह आरे' आणि 'वनशक्ती' संस्थांनी या बेकायदा कामाविरोधात आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत तातडीने काम बंद करण्याची मागणी केली आहे. 

आरे कारशेडला विरोध करत 'वनशक्ती'ने राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. त्यानुसार २०१५ मध्येच लवादाने आरेत बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. तरीही 'एमएमआरसी'ने येथे बॅरिगेटस डेब्रिजची भरणी करण्यास सुरूवात केली आहे. रोज कित्येक ट्रक भरून येथे डेब्रिज टाकले जात आहे. त्यामुळे 'एमएमआरसी'ने हद्द पार केल्याचं म्हणत 'सेव्ह आरे' आणि 'वनशक्ती'च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी १० वाजता आरे पोलीस ठाण्याजवळ मोठ्या संख्येने जमत 'एमएमआरसी'चा निषेध नोंदवला. 



'एमएमआरसी'विरोधात रितसर तक्रार नोंदवण्यास जात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काहीही कारण नसताना रोखल्याचा आरोप यावेळी 'वनशक्ती' आणि 'सेव्ह आरे'ने केला आहे. पोलिसांनी रोखल्याने काही वेळ आरेत चांगलाच गोंधळ झाला. कार्यकर्ते नि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली. शेवटी पोलिसांना एमएमआरसीविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी लागली , अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


चार तक्रारी दाखल

सेव्ह आरे, वनशक्ती, जनाधार आणि आरेतील तबेले मालक अशा चार संस्थांकडून बुधवारी चार वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


दोन दिवसांचा अल्टिमेटम

या तक्रारीनुसार दोन दिवसांत काम बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत काम बंद झाले नाही, तर पर्यावरण प्रेमी आणि तक्रारदार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी तक्रारदारांकडून देण्यात आला आहे.  



कामास परवानगी नाही

आरेत भरणी टाकण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, अशी कबुली उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती अधिकाराखाली दिली आहे. त्यामुळे एकीकडे लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी 'एमएमआरसी' इतर यंत्रणांना अंधारात ठेवत काम करत असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला.

दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत संबंधित अधिकाऱ्यांना काम बंद करण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा