Good News! सिडकोच्या जमिनीची मालकी आता रहिवाशांकडे

सिडकोच्या जमिनीवरील घरांची दुरूस्ती वा अतिरिक्त बांधकाम करायचं असेल वा हे घर विकायचं असेल तर त्यासाठी सिडकोकडून ना हरकत परवानगी घ्यावी लागते. पुनर्विकासासाठीही सिडकोच्या परवानगीची गरज पडते. आता मात्र जमिनीची- घरांची मालकी सोसायटी-रहिवाशांकडे येणार असल्याने या रहिवाशांचं मालकी हक्काच्या घराचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे.

SHARE

सिडकोच्या घरांमध्ये राहणाऱ्या नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेडसह राज्यभरातील लाखो रहिवाशांना राज्य सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. सिडकोच्या जागेवरील घरांची पूर्ण मालकी आता सिडकोऐवजी थेट रहिवाशांकडे येणार आहे. गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाचं रहिवाशांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे.


सोसायट्यांना भाड्याने

गरीबांना परवडणाऱ्या दरात घरं मिळावी यासाठी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड , सिंधुदूर्ग आणि अन्य काही जिल्ह्यातील घर बांधण्यात येतात. सिडकोच्या जमिनीवरील या घरांची विक्री सर्वसामान्यांना केली जाते. पण ज्या जमिनीवर ही घर असतात ती जमिन सिडकोची असल्यानं घरांची मालकी सिडकोकडेच राहते. या जमिनी सोसायट्यांना ३०, ५०, ९९ वर्षे याप्रमाणे भाड्याने दिल्या जातात.


लाखो कुटुंबांना फायदा

त्यामुळे भाड्याचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न सिडकोच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या मनात होता. त्यामुळं सिडकोच्या घरांची मालकी रहिवाशांकडे द्यावी, अशी रहिवाशांची मागणी होती. ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर उचलून धरली आणि अखेर त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेत ही मागणी मान्य केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमधील २२ हजार कुटुंबासह राज्यभरातील लाखो कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती भाजपाचे औरंगाबादचे आमदार आणि या मागणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करणारे अतुल सावे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


सिडकोची परवानगी

सिडकोच्या जमिनीवरील घरांची दुरूस्ती वा अतिरिक्त बांधकाम करायचं असेल वा हे घर विकायचं असेल तर त्यासाठी सिडकोकडून ना हरकत परवानगी घ्यावी लागते. पुनर्विकासासाठीही सिडकोच्या परवानगीची गरज पडते. आता मात्र जमिनीची- घरांची मालकी सोसायटी-रहिवाशांकडे येणार असल्याने या रहिवाशांचं मालकी हक्काच्या घराचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार असल्याचं सावे यांनी केलं. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर औरंगाबादमधील सिडको वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांनी मोठा जल्लोष केला आहे.हेही वाचा-

Exclusive: म्हाडाबरोबरच सिडकोचाही जानेवारीत गृहधमाका, ११०० घरांसाठी लवकरच जाहिरात

एनसीएलएटीचा पत्राचाळ बिल्डरला दणका; गोरेगावमधील पत्राचाळीची जागा म्हाडाचीचसंबंधित विषय
ताज्या बातम्या