Advertisement

बिल्डरने परस्पर विकली पत्राचाळीची जागा

गुरू आषिश बिल्डरने म्हाडाला कुठलीही माहिती न देता पत्राचाळ पुनर्विकासात विक्रीसाठी असलेले मूळ क्षेत्रफळ ७ त्रयस्त विकासकांना विकल्याची धक्कादायक माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत उघडकीस आली आहे. या खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता नसल्यामुळे या प्रकरणातील गैरव्यवहारांची रक्कम २ हजार कोटींपर्यंत असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

बिल्डरने परस्पर विकली पत्राचाळीची जागा
SHARES

गोरेगावच्या सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळीच्या बहुचर्चित घोटाळ्यात गुरू आषिश बिल्डरने म्हाडाला कुठलीही माहिती न देता विक्रीसाठी असलेले मूळ क्षेत्रफळ ७ त्रयस्त विकासकांना विकल्याची धक्कादायक माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत उघडकीस आली आहे. या खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता नसल्यामुळे या प्रकरणातील गैरव्यवहारांची रक्कम २ हजार कोटींपर्यंत असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 


बिल्डरवरील दोषारोप

विकासक मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि. ने २००८ मध्ये गोरेगावच्या सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काम सुरू केलं; परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६७२ रहिवाशांना प्रत्येकी ७६७ चौ. फुटांचं घर बांधून दिलं नाही. याशिवाय म्हाडाला करारानुसार २ लाख २८ हजार ९६१ चौ.मी. जागा बांधून दिली नाही.


आर्थिक घोटाळ्याचा तपास

२०११ मध्ये या प्रकल्पातील गैरव्यवहार उघड होताच म्हाडाने बिल्डरवर कारवाई सुरू केली. या प्रकल्पाबाबतचा चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने गुरू आशिषला नोटीस बजावली. मात्र या नोटीशीला गुरू आशिष दाद देत नसल्यामुळे मंगळवारी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर अधिक तपासासाठी खेरवाडी पोलिसांनी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला.


रक्कम वाढण्याची शक्यता

पोलिस चौकशीत बिल्डर गुरू आशिष कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि. चे संचालक व इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी म्हाडाने दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र म्हाडाला कोणतीही माहिती न देता ७ त्रयस्थ विकासकांना विकल्याचं पुढं आलं. ही रक्कम सुमारे १ हजार ३४ कोटी रुपयांची असून भविष्यात ही रक्कम वाढण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे २००७ आणि २०११ मध्ये गुरू आशिषचे संचालक कोण होते? याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.



हेही वाचा-

पत्राचाळीतील रहिवाशांच्या भाड्याचा प्रश्न तीन महिन्यांत सुटणार!

पत्राचाळ घोटाळा- म्हाडानं बिल्डरच्या मुसक्या आवळल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा