मेट्रो स्थानकाबाहेरील खड्ड्यात युवक पडला

 Pali Hill
मेट्रो स्थानकाबाहेरील खड्ड्यात युवक पडला

मुंबई - बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास शाळेतून घरी चाललेला शुभम वृजेस दुबे हा 16 वर्षाचा मुलगा जागृतीनगर मेट्रो स्थानकाबाहेरील खड्ड्यात पडला. 60 फुट खोल खड्ड्यात पडलेल्या शुभमला त्वरीत बाहेर काढत जवळच्या दिशा रूग्णालयात नेण्यात आले. पण येथे अत्यावश्यक उपचार यंत्रणा नसल्याने राजावाडी, हिरानंदानी आणि शेवटी केईएम रुग्णालयात नेण्यात आले. शुभमवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. तर शुभमला नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान एमएमओपीएलने याविषयी काहीही बोलण्यास नकार देत हात झटकले आहेत. तर एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मेट्रो स्थानकाखालील खड्ड्यावर जाळ्या लावण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने मेट्रोच्या कामात निष्काळजीपणा आणि मेट्रो सुरू करण्याकरता घाई केल्याने मेट्रो स्थानकाखालील खड्डे बुजवले गेले नाहीत. तर एमएमआरडीएनेही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत त्वरीत खड्डे बुजवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

Loading Comments