Advertisement

खूशखबर... म्हाडाची विरार फास्ट, १९ आॅगस्टला फुटणार ९०१८ घरांची बंपर लाॅटरी

कोकण मंडळाकडून विरार, बोळींज इथं सर्वात मोठा अंदाजे १० हजार घरांचा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातील घरांसाठी याआधी दोनदा लाॅटरी फुटली असून तिसरी लाॅटरी कधी फुटणार याकडेचं सर्वाचं लक्ष होतं. त्यानुसार सोमवारी कोकण मंडळानं विरारच्या लाॅटरीची घोषणा केली आहे. विरार, बोळींज, वेंगुर्ला, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अंबरनाथ, कल्याण येथील घरांचा या लाॅटरीत समावेश असणार आहे.

खूशखबर... म्हाडाची विरार फास्ट, १९ आॅगस्टला फुटणार ९०१८ घरांची बंपर लाॅटरी
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळानं परवडणाऱ्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना इच्छुकांना खूशखबर दिली आहे. विरारच्या अंदाजे ३३०० घरांसहित कोकण परिसरातील तब्बल ९०१८ घरांसाठी १९ आॅगस्टला लाॅटरी फुटणार असून ही म्हाडाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी लाॅटरी असणार आहे. या लाॅटरीच्या अर्जासाठी १८ जुलैपासून नोंदणी सुरू होणार असल्यानं इच्छुकांनो अर्ज भरण्यासाठी तयार रहा.

गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईकरांना मुंबईसह विरारमधील म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीची प्रतिक्षा होती. परंतु 'मे' पासून लाॅटरी सातत्याने हुलकावणी देत होती. अखेर विरार, कोकण मंडळाच्या निमित्ताने का होईना, पण लाॅटरीची प्रतिक्षा संपली आहे. 


विरारमधील घर सगळ्यात महाग 

विरार, बोळींज मधील मध्यम गटातील घराची किंमत ४२ लाख ७४ हजार इतकी आहे, तर अल्प गटातील घराची किंमत २४ लाख ७५ हजार अशी आहे. मिरा रोडमधील अत्यल्प गटातील घराची किंमत १७ लाख रुपये इतकी आहे. सर्वात कमी किंमत ही ठाण्यातील बाळकुममधील घरांची असून या घरांची विक्री ६ लाख १८ हजार रुपयांना होणार आहे. विरारमधील घरांच्या किंमती महागडी असल्याने इच्छुकांमधून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.  


विरारचा आकडा मोठा

कोकण मंडळाकडून विरार, बोळींज इथं सर्वात मोठा अंदाजे १० हजार घरांचा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातील घरांसाठी याआधी दोनदा लाॅटरी फुटली असून तिसरी लाॅटरी कधी फुटणार याकडेचं सर्वाचं लक्ष होतं. त्यानुसार सोमवारी कोकण मंडळानं विरारच्या लाॅटरीची घोषणा केली आहे. विरार, बोळींज, वेंगुर्ला, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अंबरनाथ, कल्याण येथील घरांचा या लाॅटरीत समावेश असणार आहे.


'अशी' असेल लाॅटरी

बाळकुम-ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खथोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,.४५५ घरांचा समावेश लाॅटरीत आहे. तर ही घर अत्यल्प गटातील आहेत.

मिरारोड, कावेसर (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), विरार-बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण) येथील अल्प उत्पन्न गटातील ४३४१ घरांचा समावेश.

बाळकुम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरारोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार, बोळींज येथील मध्यम उत्पन्न गटातील २१५ घरांचा समावेश.

तर वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरारोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील उच्च उत्पन्न गटातील ७ घरांचा समावेश.


'या' बाबींकडे लक्ष द्या

  • म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर माहिती पुस्तिका होणार उपलब्ध.
  • याच संकेतस्थळावरून १८ जुलै रोजी, दुपारी २ वाजल्यापासून अर्जाची नोंदणी सुरू होईल.
  • तर ८ आॅगस्टपर्यंत रात्री ११.५९ पर्यंत अर्ज नोंदणी करता येईल
  • आॅनलाईन अर्ज भरण्यास १९ जुलैला दुपारी २ वाजल्यापासून सुरूवात
  • १० आॅगस्ट रोजी सायंकाळी १० वाजेपर्यंत अर्ज भरता येणार
  • आॅनलाइन अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरण्याची सोय
  • एनईएफटी, आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचाही पर्याय
  • त्याचबरोबर डेबिट, क्रेडीट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरा


उत्पन्न गट

  • अत्यल्प गट- २५ हजार रुपये
  • अल्प गट- २५००१ ते ५०,००० रुपये
  • मध्यम गट- ५०,००१ ते ७५,०००रुपये
  • उच्च गट- ७५,००१ वा त्यापेक्षा अधिक


अनामत रक्कम (अर्ज शुल्कासह)

  • अत्यल्प गट- ५,४४८ रुपये
  • अल्प गट- १०,४४८ रुपये
  • मध्यम गट- १५,४४८ रुपये
  • उच्च गट- २०,४४८ रुपये



हेही वाचा-

मुंबई मंडळाच्या लॉटरीत कोकण मंडळाचा खोडा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा