Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट - अखेर म्हाडा भवनाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!


मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट - अखेर म्हाडा भवनाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!
SHARES

परवडणाऱ्या घरांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो कुटुंबीयांना हक्काचे सुरक्षित छप्पर देणाऱ्या म्हाडा भवनातील कर्मचाऱ्यांच्याच डोक्यावरील छप्पर कसे असुरक्षित आहे, याचा पर्दाफाश नुकताच 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. म्हाडा भवनाच्या इमारतीची दुर्दशा झाली असून स्लॅबचे भाग कोसळत असल्याचे मुंबई लाइव्हचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाला (म्हाडा भवनाच्या इमारतीची देखभाल करणाऱ्या) अखेर जाग आली आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने म्हाडा भवनाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

वांद्र्यातील कलानगर येथे म्हाडा भवनाची इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाला जवळपास 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारत धोकादायक नसली तरी इमारत दुरुस्तीला आली आहे. भिंतींना, पिलरला भेगा पडल्या असून इमारतीच्या आतील सळया गंजल्या आहेत. अशा परिस्थितीत इमारतीची योग्य ती डागडुजी आणि दुरूस्ती वेळेत होणे गरजेचे आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने चार वर्षांपूर्वी इमारतीच्या काही भागाची दुरूस्ती सुरू केली. मात्र चार वर्षापासून ही दुरूस्ती सुरूच आहे. त्याचवेळी इमारतीचा मोठा भाग दुरूस्तीशिवाय असल्याने त्या भागाची मोठी दुरवस्था झाली आहे.

महिन्याभरापूर्वी इमारतीतील चौथ्या मजल्यावरील सचिव कार्यालयातील स्लॅबचा काही भाग कोसळला होता. यात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. यासंबंधीचे सविस्तर वृत्त मुंबई लाइव्हने प्रसिद्ध केले. त्यानंतर लागलीच मुंबई मंडळाने इमारतीची पाहणी करुन खराब झालेले स्लॅब काढून टाकले आहेत.

आता संबंधित विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करत दुरूस्तीचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार व्हिजेटीआय आणि आयआयटीमधील तज्ज्ञांची समिती स्थापन करुन त्यांच्याकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.



हेही वाचा

25 वर्षांच्या आतच आमदारांचा मनोरा ढासळतोय!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा