Advertisement

म्हाडा लाॅटरी: इथे बघा लाइव्ह

म्हाडाच्या ८१९ घरांच्या सोडतीचं काऊंटडाऊन सुरू झालं असून ६५ हजार अर्जदारांचं लक्ष या लाॅटरीकडे लागलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आणि यशस्वीपणे लाॅटरी पार पडेल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

म्हाडा लाॅटरी: इथे बघा लाइव्ह
SHARES

वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात म्हाडाच्या ८१९ घरांच्या सोडतीचं काऊंटडाऊन सुरू झालं असून ६५ हजार अर्जदारांचं लक्ष या लाॅटरीकडे लागलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आणि यशस्वीपणे लाॅटरी पार पडेल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 




सकाळी १० वाजेपासून सुरूवात

दरवर्षी मे महिन्यात मुंबईतील घरांसाठी सोडत निघते. पण यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे लाॅटरीसाठी पुरेशी घरंच नसल्याने यात खंड पडला. तरीही मंडळाने कशीबशी ८१९ घरं शोधून काढली. याच घरांसाठी शुक्रवारी, १० नोव्हेंबरला रंगशारदात सकाळी १० वाजेपासून लाॅटरीच्या सोडतीला सुरूवात झाली आहे.



६५, १२६ अर्जदार नशीब आजमवणार

या लाॅटरीत ६५, १२६ अर्जदार आपलं नशीब आजमवणार आहेत. रंगशारदा सभागृहाची आसन क्षमता अंदाजे ५०० असल्याने 'प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य' या तत्वावर अर्जदारांना सभागृहात प्रवेश मिळणार आहे. ज्या अर्जदारांना सभागृहात एण्ट्री मिळणार नाही, त्यांच्यासाठी सभागृहाच्या खाली बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे ६ एलईडी स्क्रीन लावण्यात आले असून तिथे त्यांना 'लाइव्ह लाॅटरी' पाहता येईल.


इथंही दिसेल 'लाइव्ह' निकाल

रंगशारदा सभागृहाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अर्जदारांसाठी आवश्यक त्या सुविधाही येथे पुरवण्यात आल्या आहेत. सोबतच म्हाडाच्या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लाॅटरीचं लाइव्ह वेबकास्टिंग केलं जाणार आहे. तर http://www.facebook.com/mhadal2017 या लिंकवर लाॅटरीचं 'फेसबुक लाइव्ह' होणार आहे. या लाॅटरीचा निकाल सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांना आणि विजेत्यांना पाहता येईल.



हेही वाचा-

खूशखबर, गोरेगावातील ‘त्या’ जागेवर म्हाडा बांधणार ५ हजार घरे

अरेरे, म्हाडाच्या १६ घरांना शून्य प्रतिसाद

अभिनंदन, तुम्हाला लाॅटरीआधीच म्हाडाचं घर लागलं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा