पात्रता तपासणी न केलेल्या म्हाडा कोकण मंडळाच्या विजेत्यांना पुन्हा संधी

कोकण मंडळानं पात्रता तपासणीसाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यानुसार आता विजेत्यांना १० सप्टेंबरला म्हाडा भवनात जाऊन पात्रता तपासणी करून घेता येईल, असं कोकण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

SHARE

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून गेल्या महिन्यात काढण्यात आलेल्या लाॅटरीतील ज्या विजेत्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रं जमा केलेल नाहीत, अशा विजेत्यांसाठी दिसालादायक बातमी आहे. कोकण मंडळानं पात्रता तपासणीसाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यानुसार आता विजेत्यांना १० सप्टेंबरला म्हाडा भवनात जाऊन पात्रता तपासणी करून घेता येईल, असं कोकण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.


कधी निघाली होती लाॅटरी?

९०१८ घरांसाठी २५ आॅगस्टला म्हाडा भवनात लाॅटरी काढण्यात आली होती. म्हाडाच्या इतिहासातील सर्वात मोठी लाॅटरी अशी या लाॅटरीची ओळख झाली असतानाच या लाॅटरीनं आणखी एक अनोखा विक्रम केला. तो म्हणजे लाॅटरी झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत काही विजेत्यांची पात्रता निश्चिती करत त्यांना देकार पत्र देण्यात आलं. पात्रता निश्चिती करत देकार पत्र मिळवण्यासाठी १ ते ४ वर्षाचा काळ लागतो तिथं केवळ ४८ तासांत ही प्रक्रिया कोकण मंडळानं पूर्ण केली आहे. म्हाडाने ज्यांना देकार पत्र दिलं आहे त्या विजेत्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली की त्यांना घराचा ताबा मिळणार आहे.


विजेत्यांना तात्पुरतं देकार पत्र

घरं तयार असल्यानं, ताबा देण्याच्या स्थितीत असल्यानं कोकण मंडळानं लाॅटरीच्या आधीच पात्रता निश्चिती लाॅटरी झाल्यानंतर लगेच करण्याचं जाहीर केलं. त्यानुसार तयारीही केली आणि यात कोकण मंडळाला चांगलं यश मिळालं आहे. लाॅटरीनंतर दुसऱ्याच दिवशी मंडळानं पात्रता तपासणी शिबिर घेत पात्र विजेत्यांना देकार पत्र देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १३०६ विजेत्यांना तात्पुरतं देकार पत्र देण्यात आलं आहे. तर २३०० विजेत्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली.


पुन्हा शिबिराचं आयोजन

दरम्यान संकेत क्रमांक २७०, २७१, २७२ आणि २७५ मधील विजेत्यांसाठी लाॅटरीनंतर दुसऱ्या दिवशी पात्रता तपासणी शिबीर घेण्यात आलं होतं. याच दिवशी विजेत्यांनी उपस्थित राहून पात्रता निश्चिती करणं अपेक्षित होतं. त्यामुळं जे पात्रता निश्चिती करू शकले नाहीत ते नक्कीच घर हातातून गेलं म्हणून निराश झाले असतील. पण आता कोकण मंडळानं १० सप्टेंबरला पुन्हा शिबीर आयोजित केल्यानं आता त्यांना निराश होण्याची गरज नाही.हेही वाचा-

गुडन्यूज! म्हाडाची सर्व गटातील घरं होणार स्वस्त!!

उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी ५१ टक्के रहिवाशांची संमतीसंबंधित विषय
ताज्या बातम्या