Advertisement

गिरगावमधील मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४८ मजली इमारत

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गिरगावमधील मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गिरगावमधील मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४८ मजली इमारत
SHARES

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गिरगावमधील मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) येथील प्रकल्पबाधितांसाठी ४८ मजली इमारत बांधण्यात येत आहे.

या इमारतीसाठी मागवलेल्या पूर्वअर्हता निविदेला  बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या इमारतीमध्ये कुलाबा-वांद्रे-सिप्झ (मेट्रो-३) प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवासी, व्यावसायिक व कार्यालयांचं पुनर्वसन केलं जाणार आहे.

गिरगाव पुनर्विकास इमारतीमध्ये ४७३ रहिवासी सदनिका असतील. तर १३७ व्यावसायिक आस्थापना व १९ व्यावसायिक कार्यालयांचाही समावेश असेल. इमारतीचे तीन तळ मजले सेवा, तसंच पार्किंगसाठी राखीव असतील. ग्राउंड लेव्हल, एक ते सात मजले अंशतः व्यावसायिक गाळे व सेवा देण्यासाठी राखीव असतील.

आठ ते नऊ मजले व्यावसायिक गाळे, सेवा, सुविधांसाठी राखीव असतील. १० ते १८ मजल्यांवर व्यावसायिक गाळे, सदनिका असतील व १९ ते ४८ मजल्यांवर रहिवासी सदनिका असतील. या इमारतीस कार पार्किंगची सुविधा, तसेच बगीचा आदी सुविधा राहतील.  ४८ मजल्यांपैकी ३९ मजले रहिवासी सदनिकांसाठी राखीव असतील.

काळबादेवी, गिरगाव पुनर्वसन आराखड्याअंतर्गत सहा वेगवेगळ्या भूखंडांचा एकत्रितरित्या विकास केला जाणार आहेत. एकूण सहा भूखंडांपैकी के२, के३, जी३ हे भूखंड एकात्मिकरित्या विकसित केले जातील; तर के१, जी १ व जी२ हे भूखंड मेट्रोसंबंधी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. हेही वाचा -

वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन

अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही

आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा