Advertisement

कामात दिरंगाई केल्याने मेट्रोच्या २ कंत्राटदारांना नारळ

कामात दिरंगाई होत असल्याने दहिसर (पूर्व) (Dahisar East) ते अंधेरी (पूर्व) Andheri East) या मेट्रो-७ (Metro 7) मार्गिकेवरील एका कंत्राटदाराचं (Contractor) कंत्राट (Contract) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केलं आहे.

कामात दिरंगाई केल्याने मेट्रोच्या २ कंत्राटदारांना नारळ
SHARES

कामात दिरंगाई होत असल्याने दहिसर (पूर्व) (Dahisar East) ते अंधेरी (पूर्व) Andheri East) या मेट्रो-७ (Metro 7) मार्गिकेवरील एका कंत्राटदाराचं (Contractor) कंत्राट (Contract) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Mumbai Metropolitan Region Development Authority) रद्द केलं आहे. याशिवाय डी. एन. नगर ते मंडाले या मेट्रो-२ बी मार्गिका आणि मंडाले येथील कारडेपोचं काम करणाऱ्या कंत्राटदाराचंही कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Simplex Infrastructure Ltd.) आणि मे. एमबीझेड-आरसीसी (MBZ-RCC) अशी या कंत्राटदार कंपन्यांची नावं आहेत. 

डी. एन. नगर ते मंडाळे या मेट्रो २ बी (Metro 2B) या २३.६४३ किमी मार्गिकेपैकी १२.७ किमी मार्गासाठी सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Simplex Infrastructure Ltd.) या कंपनीस एक हजार ८० कोटी रुपयांचे कंत्राट (Contract) जानेवारी २०१८ मध्ये दिलं होतं. त्यानंतरच्या ३० महिन्यांत ६५ टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र २५ महिन्यांत केवळ ५.०७ टक्केच काम झालं.  याच मार्गिकेवरील ५.९ किमी मार्गासाठी मे. एमबीझेड-आरसीसी (MBZ-RCC) या कंपनीस  ५२१.२१ कोटी रुपयांचं कंत्राट एप्रिल २०१८ मध्ये देण्यात आलं होतं. या कामापैकी ६० टक्के काम ३० महिन्यांत होणं अपेक्षित होतं. मात्र २१ महिन्यांनतरही केवळ ४.४८ टक्केच काम पूर्ण झालं. डेपोच्या बांधकामासाठी एमबीझेड-आरसीसी कंपनीला ३९०.४४ कोटी रुपयांचे कंत्राट जानेवारी २०१८ मध्ये देण्यात आले होते. त्यानंतरच्या ३६ महिन्यांत ५० टक्के काम अपेक्षित होते, मात्र केवळ ६.९८ टक्केच काम २५ महिन्यांत पूर्ण झाले.

कामातील प्रगती, कामगारांचे संप, प्रलंबित देयके याबाबत पंचवीस पत्रांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. एमएमआरडीएचे (Mumbai Metropolitan Region Development Authority) आयुक्त आर. ए. राजीव (R. A. Rajiv) यांच्या अध्यक्षेतेखाली ७ जानेवारीला पुनर्आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर कामामध्ये सुधारणा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम संधी देण्यात आली. त्यामध्येदेखील कंत्राटदारांनी (Contractor) कसलीही प्रगती न साधल्यामुळे ही कंत्राटे (Contract) रद्द करण्यात आली. 

  • कामात दिरंगाई होत असल्याने दहिसर (पूर्व) (Dahisar East) ते अंधेरी (पूर्व) Andheri East) या मेट्रो-७ (Metro 7) मार्गिकेवरील एका कंत्राटदाराचं (Contractor) कंत्राट (Contract) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Mumbai Metropolitan Region Development Authority) रद्द केलं आहे. 
  • डी. एन. नगर ते मंडाले या मेट्रो-२ बी मार्गिका आणि मंडाले येथील कारडेपोचं काम करणाऱ्या कंत्राटदाराचंही कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. 
  • सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Simplex Infrastructure Ltd.) आणि मे. एमबीझेड-आरसीसी (MBZ-RCC) अशी या कंत्राटदार कंपन्यांची नावं आहेत. हेही वाचा -

बुलेट ट्रेनवरून केंद्र-राज्यात जुंपणार

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणार कशी? अर्थसंकल्पात तरतूदच नाही

एमआरआयडीसी २ वर्षांत करणार 'या' १० पुलांची पुनर्बाधणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा