ऐतिहासिक! मेट्रो ३ चं पहिलं 'टीबीएम' मुंबईच्या पोटातून आलं बाहेर!!

२१ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबर २०१७ चा तो दिवस आणि आजचा २४ सप्टेंबर २०१८ चा दिवस मेट्रो-३ च्या कामाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरला. कारण आज, पहिलं टीबीएम मशिन आपली मोहीम फत्ते करून मुंबईच्या पोटातून बाहेर आलं. हे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) चं मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.

  • ऐतिहासिक! मेट्रो ३ चं पहिलं 'टीबीएम' मुंबईच्या पोटातून आलं बाहेर!!
  • ऐतिहासिक! मेट्रो ३ चं पहिलं 'टीबीएम' मुंबईच्या पोटातून आलं बाहेर!!
  • ऐतिहासिक! मेट्रो ३ चं पहिलं 'टीबीएम' मुंबईच्या पोटातून आलं बाहेर!!
SHARE

मेट्रो ३ प्रकल्पासाठी मरोळ ते विमानतळ असा १.२६ किमीचा भुयारी मार्ग खोदून पहिलं टीबीएम मशिन, वैनगंगा इथून सोमवारी, २४ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता मुंबईच्या पोटातून बाहेर पडलं. वर्षभरापूर्वी म्हणजेच २१ सप्टेंबर २०१७ ला माहीम इथल्या मेट्रो-३ च्या साईटवरील ६० मीटर व्यासाच्या विहिरीत सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) चं कटर सोडण्यात आलं होतं.
'असं' शिरलं होतं पोटात

त्यानंतर टीबीएम मशिनचे सुटे भाग विहिरीत सोडत ते जोडत २ महिन्यांनंतर अर्थात १० नोव्हेंबर २०१७ मध्ये पहिलं टीबीएम मुंबईच्या पोटात सोडण्यात आलं. मग हळूहळू एक-एक करत तब्बल १७ टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरल्या नि या मशिन्स दगड, खडक फोडून मुंबईच्या पोटात मेट्रो-३ साठी रस्ता खोदू लागल्या.


मैलाचा दगड

२१ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबर २०१७ चा तो दिवस आणि आजचा २४ सप्टेंबर २०१८ चा दिवस मेट्रो-३ च्या कामाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरला. कारण आज, पहिलं टीबीएम मशिन आपली मोहीम फत्ते करून मुंबईच्या पोटातून बाहेर आलं. हे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) चं मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.
२ वर्षांनी येणार बाहेर

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गासाठी ३३.५ किमीचा भुयारी मार्ग खोदला जाणार आहे. हा भुयारी मार्ग खोदण्यासाठी 'एमएमआरसी'कडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात 'टीबीएम' मशिनचा वापर केला जात आहे. परदेशातून हे टीबीएम मशिन आणलं जात असून १७ टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात सोडण्यात आल्या आहेत. या मशिन्स भूगर्भात भुयारी रस्ता खोदण्याच काम करत असून २ वर्षानंतर भुयारी मार्गाचं काम संपून शेवटचं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटातून बाहेर पडणार आहे.
मुंबईला शांघायपेक्षाही भारी बनवू

मुंबईला शांघाय बनवू असं स्वप्न आतापर्यंत मुंबईकरांना याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवलं. पण मुंबईचं शांघाय काही झालं नाही. आता खऱ्या अर्थानं मुंबईच्या विकासाच्यादृष्टीनं एक-एक प्रकल्प मार्गी लागत असून येत्या तीन वर्षात मुंबई देशातील इतर शहरांच्या पुढे, विकसित शहर म्हणून नावारूपाला येईल.

आम्हाला मुंबईचं शांघाय नाही, तर मुंबईला मुंबईच बनवायचं आहे. अगदी शांघायच्या लोकांनाही मुंबईत यावंस वाटेल, शांघायला मुंबई करावंस वाटेल, अशी मुंबई आम्ही येत्या ३ वर्षांत तयार करून अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तर त्याचवेळी मेट्रो-३ चं अत्यंत अवघड आणि अडचणींच काम यशस्वीरित्या पूर्ण नेत असल्याबद्दल 'एमएमआरसी'चं कौतुक करत मेट्रो-३ च काम वेळेत पूर्ण करण्याची हमीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा-

एेतिहासिक...पहिलं टीबीएम मुंबईच्या पोटात सोडण्यास सुरूवात

अखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं!


मेट्रो ३ चा ५ किमीचा भुयारी मार्ग पूर्ण


संबंधित विषय
ताज्या बातम्या