Advertisement

बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?


बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?
SHARES

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी बीकेसीतील जागा देण्यास अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. बीकेसीमध्ये इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर (आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र) अर्थात आयएफएससी सेंटरची उभारणी ज्या जागेत होणार होती, तीच जागा बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे 'एमएमआरडीए'चा 'आयएफएससी सेंटर' प्रकल्प बारगळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

पण, बीकेसीत 'आयएफएससी सेंटर' बांधणारच असा निर्धार 'एमएमआरडीए'ने व्यक्त केला आहे. त्यामुळेच बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी 'आयएफएससी'ची जागा दिली असली तरी इतर दोन पर्यायी जागा 'एमएमआरडीए'ने शोधल्या असून त्या जागांची व्यवहार्यता रेल्वे मंत्रालयाने तपासून घ्यावी, अशी मागणी केली आहे.  

या दोन्ही जागा व्यवहार्य वाटल्या नाही, तर मग 'आयएफएससी सेंटर'ची जागा देण्यात येणार आहे. मात्र बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी केवळ ९ हेक्टर जागा लागणार आहे. जेव्हा की 'आयएफएससी सेंटर' ५० हेक्टर जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी 'आयएफएससी'मधील काही जागा दिली तरी त्याचा प्रकल्पावर फारसा परिणाम होणार नाही, असे एमएमआरडीएकडून स्पष्ट केले जात आहे. 

या जागेवर बुलेट ट्रेन टर्मिनल बांधताना टर्मिनलमुळे 'आयएफएससी सेंटर'ला कोणतीही बाधा येणार नाही या प्रकारे टर्मिनलचे डिझाईन रेल्वे मंत्रालयाने तयार करावे, यावर 'एमएमआरडीए' ठाम आहे. त्यामुळेच 'आयएफएससी सेंटर' प्रकल्पाला कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास 'एमएमआरडीए'कडून व्यक्त केला जात आहे.


इतर दोन पर्याय असे...

  • धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलनजीकचा भूखंड
  • धारावीतील भूखंड


विरोध मावळला

बीकेसीत 'आयएफएससी सेंटर' उभारण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचे असून हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. त्यामुळेच 'आयएफएससी सेंटर'ची जागा देण्यासाठी 'एमएमआरडीए'ने साफ नकार दिला होता. यावरून गेली कित्येक महिने मोठा वाद सुरू होता. पण शेवटी केंद्र सरकारच्या दबावामुळेच राज्य सरकारचा विरोध मावळल्याने ही जागा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.


असा आहे बुलेट ट्रेन प्रकल्प

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
  • एकूण खर्च १ लाख ८ हजार कोटी
  • ५०८ किमी अंतराचा प्रकल्प
  • एकूण १२ स्थानके
  • वेग ताशी ३५० किमी 
  • ५०८ किमीचं अंतर ८ तासांएवजी केवळ २ तास ७ मिनिटांत होणार पूर्ण
  • ५०८ किमी पैकी १५६ किमीचा मार्ग महाराष्ट्रातून तर ३५१ किमीचा मार्ग गुजरातमधून जाणार
  • मुंबईतील भुयारी स्थानक वगळता बुलेट ट्रेन मार्ग पूर्णत उन्नत मार्ग असणार



'आयएफएससी सेंटर'ची वैशिष्ट्ये 

  • आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र प्रकल्प
  • बीकेसीतील जी ब्लाॅकमधील ५० हेक्टर जागेवर प्रकल्पाची उभारणी
  • सध्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू
  • गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्राच्या धर्तीवर बीकेसी 'आयएफएससी'ची उभारणी


राज्य सरकारने बीकेसीतील जागा बुलेट ट्रेन टर्मिनला देण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याआधी रेल्वे मंत्रालयाने एमएमआरडीएने सुचवलेल्या दोन पर्यायी भुखंडाची व्यवहार्यता तपासावी यासाठी एमएमआरडीए आग्रही असणार आहे. जर हे दोन पर्याय तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य ठरले नाही तर आयएफएससीची जागा आहेच. पण या जागेवर बुलेट ट्रेन टर्मिनल बांधताना आयएफएससी प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने टर्मिनल बांधावे यासाठीही आम्ही आग्रही असणार आहोत.

-यु. पी. एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा