Advertisement

म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाचे ७० कोटी द्या; महापौर, आयुक्तांकडे मागणी

अंशदानाच्या रुपानं दुरूस्ती मंडळाला पालिकेनं दरवर्षी १० कोटी रुपये देणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र, पालिकेनं २०१२ पासून २०१८ पर्यंत अंशदानाची रक्कमच दिलेली नाही. त्यामुळं आतापर्यंत ७० कोटी रुपये पालिकेकडून येणं बाकी आहे.

म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाचे ७० कोटी द्या; महापौर, आयुक्तांकडे मागणी
SHARES

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाची ७० कोटी रुपयांची रक्कम मुंबई महानगर पालिकेकडून येणं बाकी आहे. ही रक्कम त्वरीत पालिकेनं दुरूस्ती मंडळाला द्यावी, अशी मागणी दुरूस्ती मंडळानं एका पत्राद्वारे केली आहे. तर या मागणीसाठी दुरूस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांची बुधवारी भेटही घेतली आहे.


२०१२ पासून थकीत

अंशदानाच्या रुपानं दुरूस्ती मंडळाला पालिकेनं दरवर्षी १० कोटी रुपये देणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र, पालिकेनं २०१२ पासून २०१८ पर्यंत अंशदानाची रक्कमच दिलेली नाही. त्यामुळं आतापर्यंत ७०  कोटी रुपये पालिकेकडून येणं बाकी आहे. दुरूस्ती मंडळाच्या अखत्यारीत १५ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीची संपूर्ण जबाबदारी दुरूस्ती मंडळावर आहे.  


दुरूस्तीसाठी कमी निधी

या सर्व इमारती जीर्ण झाल्या असून इमारतींचा आकडा मोठा असल्यानं या इमारतींच्या दुरूस्तीसाठी मंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची गरज असते. पण प्रत्यक्षात मात्र सरकारकडून दुरूस्तीसाठी कमी निधी मिळतो. त्यामुळं दुरूस्तीवर त्याचा परिणाम होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर दुरूस्ती मंडळानं ७० कोटींची अंशदानाच्या रुपानं थकवलेली रक्कम द्यावी अशी मागणी पालिकेकडे केली आहे. आता पालिका यावर काय निर्णय घेते आणि ही रक्कम देते का हाच प्रश्न आहे. 



हेही वाचा - 

मुंबईकरांवर पाणीसंकट, उद्यापासून १० टक्के पाणीकपात

धारावी सेक्टर-५ म्हाडाकडून जाणार डीआरपीच्या ताब्यात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा