Advertisement

तुमची इमारत पडण्याच्या स्थितीत नाही ना? जाणून घ्या काय असतात धोकादायक इमारतीची लक्षणं

आपले राहते घर, इमारत बोलू शकत नाही. पण त्याची वेगवेगळी लक्षणं असतात. यावर आवर आपली नजर असणं आवश्यकच आहे. योग्यवेळी लक्षं दिलंत तर पुढचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधी धोका कसा ओळखाल याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

तुमची इमारत पडण्याच्या स्थितीत नाही ना? जाणून घ्या काय असतात धोकादायक इमारतीची लक्षणं
SHARES

डोंगरी भागात इमारत कोसळल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहेयापूर्वी देखील मुंबईत इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेतधोकादायक इमारतींवर प्रशासना मार्फत कुठलीच कारवाई न होणेइमारत धोकादायक असूनही नागरिकांनी तिथेच राहणं अशा कारणांमुळे या घटना होतात आणि अनेक जण मृत्यूमुखी पडतातखास करून जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना अधिक धोका असतोअशी घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून प्रत्येकानं काळजी घेण गरजेचं आहे

आपले राहते घरइमारत बोलू शकत नाहीपण त्याची वेगवेगळी लक्षणं असतातयावर आवर आपली नजर असणं आवश्यकच आहेयोग्यवेळी लक्षं दिलंत तर पुढचा धोका टाळता येऊ शकतोत्यामुळे दुर्घटना घडण्याआधी धोका कसा ओळखाल याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.  


सोसायटीनं एक फाईल करून दर दहा महिन्यांनी काही नोंद आपल्या इमारतीसंबंधी करायल्या हव्यातइमारत किती जुनी आहेत्यानंतर शेवटचं स्ट्रक्चर ऑडिट कधी केलं होतंत्या स्ट्रक्चर ऑडिटमधून काय समोर आलं होतंहे सर्व मुद्दे त्या फाईलमध्ये नमुद हव्या आहेत.

इमारतीसोबतच सभोवतालच्या जमिनीलगतच्या भागाचे निरीक्षण करणं आवश्यक आहेइमारतीच्या सभोवतालची जमीन तळमजल्याच्या फरशीपेक्षा उंचावर असेल तर पावसात घरात पाणी शुरू शकतेतळमजल्याची फरशी खचू शकते.

पावसाळ्यात इमारतीभोवती पावसाचे पाणी साचून राहणेउंदीर-घुशीच्या उपद्रवामुळे इमारती सभोवतालची जमीन भुसभुशीत होणेकमकुवत होणेजमिनीखालच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून सभोवताली पाणी झिरपणेयामुळे इमारतीच्या पायाखालच्या जमिनीचे वजन पेलण्याची क्षमता कमी होऊन इमारीचा भाग खचू शकतो.

तळमजल्याच्या भिंतींना पावसाळ्यात ओल धरणेउन्हाळ्यात सुकल्यानं पोपडे धरणे यामुळे त्या भागातील प्लास्टर पडतेअसावेळी वीट दिसू लागतेयामुळे बांधकाम हळू-हळू कमकुवत होऊ लागते.

इमारतीत बांधकाम वैगरे चालत असेल तर त्याची परवानगी घेणं आवश्यक आहेपरवानगी देण्यात आली तरी इमारतीच्या पिलरला कुठलाही धक्का बसता कामा नये याची काळजी घ्यावीजर इमारतीच्या पिलरला जर धक्का लागणं हे धोकादायक असू शकतं.

बाल्कनीबाल्कनीचे कठडेगच्चीचे कठडेखिडक्यांचे छज्जे-झुकणे याकडे लक्ष असणं गरजेचं आहेत्यामुळे तो भाग पडून नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता असू शकते.

बाहेरील भिंतीतील कॉलमछज्जेबीम यांना भेगा पडणेप्लास्टर गळून पडणेतडे जाणेगंजलेल्या सळ्या दिसणे ही सर्व लक्षणं इमारतीचा आरसीसाचा सांगाडा कमकुवत होण्याची सुरुवात आहे असे दर्शवते.

प्लास्टरवर शेवाळे येणेड्रेनेज पाईपच्या सांध्यावर झाडे उगवणंगवत वाढणंड्रेनेज-प्लिबग लाइन गंजणे किंवा फुटणे या समस्या दिसायला लागल्या की समजून जा की घरात होणाऱ्या लिकेजकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आहेतयासाठी ड्रेनेज पाईपची गळती दुरुस्त करून घ्यावी.


इमारतीला १०-१५ वर्ष झाली की त्याचं ऑडिट होणं आवश्यकच आहेयामुळे इमारतीची नेमकी काय अवस्था आहे हे कळून येतं.

१०वरील लक्षणं आढळल्यास ऑडिट करून घ्यावंऑडिटमध्ये धोकादायक किंवा अतिधोकादायक यादीत नाव असेल तर इमारत खाली करावीअसा परिस्थितीत तात्काळ दुसऱ्या घराची व्यवस्था करणं थोडं कठिण असतंपण जीव वाचवण्यासाठी इमारत खाली करणं आवश्यक आहे



हेही वाचा

डोंगरीत ४ मजली इमारतीचा भाग कोसळून १२ जणांचा मृत्यू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा