Advertisement

मेट्रो-3 च्या नाईट शिफ्टवरील बंदी दोन आठवड्यांसाठी कायम


मेट्रो-3 च्या नाईट शिफ्टवरील बंदी दोन आठवड्यांसाठी कायम
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गाच्या कामातील नाईट शिफ्ट तब्बल 38 दिवसांपासून बंद आहे. रात्रीच्या वेळेस काम बंद ठेवल्यामुळे मेट्रो-3 च्या कामावर परिणाम होत असल्याची कबुली खुद्द मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून दिली जात आहे. असे असताना आता मेट्रो-3 च्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी देण्याची 'एमएमआरसी'ची मागणी मंगळवारी पुन्हा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.


पुढचे दोन आठवडे रात्रीच्या कामावरील बंदी कायम ठेवल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. रॉबिन जयसिंघानी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

मेट्रो-3 च्या कामामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेट्रो-3 च्या कामाच्या आवाजामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आल्याचे म्हणत त्यांनी मेट्रो-3 च्या कामाच्या, विशेषत: रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामावर आक्षेप घेतला आहे. या कामामुळे होणाऱ्या मनस्तापाचा मोबदला म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे महिना 10 हजार रुपयांची मागणीही 'एमएमआरसी'कडे केली आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान 11 ऑगस्टला न्यायालयाने रात्रीच्या वेळेस मेट्रो-3 चे काम बंद करण्याचे आदेश 'एमएमआरसी'ला दिले होते. त्यानुसार मेट्रो-3 मधील नाईट शिफ्ट बंद आहे.

यामुळे मेट्रो-3 च्या कामाला विलंब होत असून प्रकल्पाचे नुकसान होत असल्याचे म्हणत 'एमएमआरसी'ने रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. पण मंगळवारी ही परवानगी नाकारत न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी बंदी कायम ठेवली आहे. त्याचवेळी मेट्रो-3च्या कामामुळे खरोखरच नागरिकांना त्रास होत असल्याचे म्हणत कामावर नाराजीही व्यक्त केली आहे.


हेही वाचा - 

मेट्रो-३ च्या भुयारी खोदकामाला तात्पुरती स्थगिती



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा