Advertisement

एमएमआरडीएकडून 1 हजार खाटांचं विलगीकरण केंद्र

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. या पार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मदतीची हाक दिली आहे.

एमएमआरडीएकडून 1 हजार खाटांचं विलगीकरण केंद्र
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. या पार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मदतीची हाक दिली आहे. याला प्रतिसाद देत एमएमआरडीएतर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) १००० खाटांची क्षमता असलेल्या विलगीकरण केंद्राच्या उभारणीचं काम हाती घेण्यात आलं आहे.  भविष्यात गरज भासल्यास ही क्षमता ५००० खाटांपर्यत वाढवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने ट्विट करून दिली आहे.

या 1 हजारमधील पाचशे खाटांना ऑक्सिजन किटची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर पुढील पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होईल, असं प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या रुग्णांना अलगीकरण आणि विलगीकरणाची गरज आहे, तसेच अत्यवस्थ नसणारे रुग्ण अशांसाठी ही सुविधा तयार करण्यात येत अाहे. 

मुंबई शहर आणि उपनगरातील करोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. त्याचबरोबर अलगीकरण आणि विलगीकरणासाठी सुविधा आवश्यक आहेत. मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात एमएमआरडीएला सूचना प्राप्त झाल्यानुसार अलगीकरण आणि विलगीकरणाच्या सुविधेच्या कामास सुरुवात केल्याचे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर सध्या या सुविधेसाठी प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. ही सुविधा बांधकाम स्वरूपात न करता तात्पुरत्या स्वरूपातील असली तरी पावसाळ्यातदेखील टिकू शकेल अशा साधनसामग्रीचा वापर यामध्ये केला जाणार आहे.


हेही वाचा -

सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा