Advertisement

ठाण्यात पहाटेच्या सुमारास कोसळला इमारतीचा भाग

ठाणे पश्चिमेला असलेल्या इमारतीचा काहीसा भाग कोसळला. पण यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

ठाण्यात पहाटेच्या सुमारास कोसळला इमारतीचा भाग
(Image: Twitter/ANI)
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात (mumbai rains)मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात इमारती कोसळण्याच्या (building collapsed) घटना घडतात. जुन्या-जर्जर झालेल्या या इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागते. यंदाही मुंबईसह ठाण्यात अशा घटना घडल्या असून, यामध्ये काहींना आपला जीव गमवाव लागला आहे.

ठाणे (Thane) पश्चिमेला असलेल्या इमारतीचा काहीसा भाग कोसळला. पण यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेत मोठी वित्तहानी झाली आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री मुलुंड (mulund) पश्चिम इथं पावसामुळं एक भिंत कोसळल्याची घटना घडली असून, यामध्ये एकाचा मृ्त्यू झाला आहे. दिलीप वर्मा (वय ३५) असं अंगावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

काही वेळा पालिका किंवा अन्य यंत्रणांकडून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पाठवल्या जातात. पण पर्यायी जागेची व्यवस्था नसल्यामुळे किंवा दिलेली जागा राहण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्याच धोकादायक इमारतींमध्ये राहतात.

मग अचानक एकदिवस इमारत कोसळल्याची बातमी येते. यंदाच्या पावसाळ्यात (mumbai rains) सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यानंतर मग त्यावरुन जोरदार राजकारण सुरु होतं. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होता. पालिका, राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. मालाड मालवणी इमारत दुर्घटनेमध्ये हे दिसून आलं.



हेही वाचा -

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा